शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : मोफत लस देण्याच्या घोषणेनंतर विरोधकांकडून सुप्रीम कोर्टाचे आभार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 08:39 IST

Corona Vaccination: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देशातील प्रत्येकास मोफत व्हॅक्सिन मिळणार असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून सगळ्यांना मोफत व्हॅक्सिन देण्याची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहे.दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देशातील प्रत्येकास मोफत व्हॅक्सिन मिळणार असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहे. देशातील नागरिकांना मोफत व्हॅक्सिनबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची भूमिका काय आहे याबाबत विचारणा केली होती, तर व्हॅक्सिनसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे, मग व्हॅक्सिनसाठी देशातील लोकांना आणि राज्य सरकारांना पैसे का मोजावे लागत आहेत, असा प्रश्न सर्वच स्तरातून उपस्थित करण्यात आला होता.मोदींनी सर्वांना मोफत व्हॅक्सिनची घोषणा केल्यानंतर सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. ते म्हणाले, केंद्र सरकारने ठरवले असते तर आधीच सर्वांना मोफत व्हॅक्सिनची घोषणा करता आली असती. केंद्राच्या धोरणामुळे राज्यांनाही व्हॅक्सिन खरेदी करता येत नव्हते आणि केंद्र सरकारही पुरवठा करीत नव्हते.

कुठे आहेत लसी?काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त म्हणाल्या, पंतप्रधानांनी मोफत लसींची घोषणा तर केली, परंतु कुठे आहेत? या विनामूल्य लसी? ऑनलाईन नोंदणी कशासाठी? केवळ आधार कार्ड का नाही? दुर्बल घटक आणि मुलांना लसी? देण्याची मोदींची कोणती योजना आहे? लोकांना नोकऱ्या हव्या आहेत, त्यासाठी कोणत्या योजना आहेत, असा दत्त यांनी प्रश्नांचा भडिमार केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाला घाबरून निर्णय! माकपचे नेते सीताराम येचुरी म्हणाले, मोदींनी सार्वत्रिक मोफत लसीकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घाबरून घेतलेला आहे. आतापर्यंत त्यांचे राज्यांसोबतचे वागणे भेदभावपूर्णच दिसून आले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय