Corona vaccination: कोरोनावरील लस न घेताच मिळाले लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र, तरुणाने उघड केला धक्कादायक प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 11:24 AM2021-06-09T11:24:35+5:302021-06-09T11:25:17+5:30

Corona vaccination in India: कोरोना रुग्णसंख्या कमी होत असतानाच देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र या व्यापक लसीकरणाच्या मोहिमेदरम्यान काही चुका होत असल्याचेही समोर येत आहे.

Corona vaccination: A man in Bhopal claims that he received COVID19 vaccination certificate without taking a jab | Corona vaccination: कोरोनावरील लस न घेताच मिळाले लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र, तरुणाने उघड केला धक्कादायक प्रकार 

Corona vaccination: कोरोनावरील लस न घेताच मिळाले लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र, तरुणाने उघड केला धक्कादायक प्रकार 

Next

नवी दिल्ली - देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरल्याने सरकार, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसोबतच सर्वसामान्यांनाहा मोठा दिलासा मिळाला आहे. (Corona vaccination in India) कोरोना रुग्णसंख्या कमी होत असतानाच देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र या व्यापक लसीकरणाच्या मोहिमेदरम्यान काही चुका होत असल्याचेही समोर येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (A man in Bhopal claims that he received COVID19 vaccination certificate without taking a jab)

कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर लस न घेताच आपल्याला कोरोनाचे लसीकरण पूर्ण झाल्याचा मेसेज आल्याचा दावा भोपाळमधील एका तरुणाने केला आहे. दिव्येश्वर जयवार असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती देताना या तरुणाने सांगितले की, मी २७ मे रोजी लसीकरणासाठी स्लॉट बुक केला होता. मात्र लसीकरणाला जाण्यापूर्वीच मला माझे लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे असा मेसेज मोबाईलवर आला. 



 दरम्यान, भारतामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी नोंदवली गेली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाच्या ९२ हजार ५९६ रुग्णांची नोंद केली गेली. तर याच काळात २२१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या १४ तासांत देशभरामध्ये १ लाख ६२ हजार ६६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात कोरोनाचे १२ लाख ३१ हजार ४१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर २ कोटी ७५ लाख ०४ हजार १२६ जणांना कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचे २ कोटी ९० लाख ८९ हजार ६९ रुग्ण सापडले आहेत. तर ३ लाख ५३ हजार ५२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

Web Title: Corona vaccination: A man in Bhopal claims that he received COVID19 vaccination certificate without taking a jab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.