शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Corona Vaccination: लस वाया? अशक्यच! असा आहे लसीकरणाचा 'केरळ पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 06:22 IST

Corona Vaccination: एकही डोस वाया न घालवण्याचा केरळने केला विक्रम

शिक्षण आणि आरोग्य या दोन अतिशय महत्त्वाच्या क्षेत्रांत केरळ राज्य नेहमीच देशात अग्रेसर राहिले आहे. कोरोनाकहरातही केरळने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उत्तम कामगिरी बजावली आहे. जेव्हा देशभरातील राज्ये या ना त्या कारणाने लसमात्रा वाया घालवत होते तेव्हा केरळने एकही लसमात्रा वाया न घालवण्याचा विक्रम नोंदवला.हे कसे शक्य झाले?लसींच्या वापराचे सुनियोजित व्यवस्थापन आणि वेळेचे नियोजन या दोन सूत्रांमुळे हे शक्य झाले.उदाहरणार्थ, एखाद्या लसीकरण केंदरात १०० लोकांचे लसीकरण करायचे असेल तर त्यातून ज्यांना दुसरा डोस द्यायचा आहे, अशा ७०-८० लोकांची निवड करायची आणि उर्वरितांना पहिला डोस द्यायचा.डोस देताना प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने लसी वाया जाण्याचे प्रमाण शून्य राहिले.वेळेचे नियोजनआवश्यक तेवढ्याच डोसचा वापर केरळात केला जातो.लसीची कोणतीही कुपी उघडल्यानंतर चार तासांत ती १० जणांना द्यावी लागते.चार तासांनंतरही कुपी उघडीच राहिली तर त्यातील लस वाया जाते.त्यामुळे लसीकरण केंद्रात १० जण आल्यानंतरच आरोग्य कर्मचारी लसकुपी उघडतात.असे केल्याने उद्दिष्ट साध्य होते आणि लस वायाही जात नाही.लसीकरणाचे केरळ मॉडेल असे...कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांच्या ५एमएलच्या एका कुपीत लसीचे १० डोस असतात.म्हणजेच एका कुपीद्वारे १० जणांचे लसीकरण केले जाऊ शकते.कुपीतील लस कमी होऊ नये यासाठी लसनिर्मात्या कंपन्या कुप्यांमध्ये अतिरिक्त डोसही टाकतात.त्यामुळे अतिरिक्त दोघांना डोस देता येऊ शकतात.केरळमधील लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचारी प्रशिक्षित असल्याने अतिरिक्त डोस तयार करून ते अधिकाधिक लोकांचे लसीकरण करत आहेत.लसीचा एकही डोस वाया न घालवणाऱ्या या केरळ प्रारूपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केले आहे.केरळला आतापर्यंत ७३,३८,८०६ लसींचा पुरवठा झाला आहे.त्यातून केरळने ७४,२६,१६४ मात्रा लोकांना दिल्यायाचा अर्थ केरळने ८७,३५८ अतिरिक्त लसीकरण केले१ टक्के सुद्धा केरळने लसमात्रा वाया घालवल्या नाहीत

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस