शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

Corona Vaccination: लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो कशाला? माजी प्राध्यापकाची तक्रार; लस घेण्यास स्पष्ट नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 12:26 IST

Corona Vaccination: जेएनयूच्या माजी प्राध्यापकाचं थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पत्र; लसीकरण प्रमाणपत्राबद्दल नाराजी व्यक्त

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यासोबतच लसीकरण मोहिमेला वेग देण्याचं कामही सुरू आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी प्राध्यापकांनी मात्र वेगळ्याच कारणामुळे कोरोना लस घेण्यास नकार दिला आहे. पंजाब विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणून काम केलेल्या चमनलाल यांनी यासंदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्र लिहिलं आहे.राज्य कोरोना संकटात, तिजोरीवर मोठा भार; काँग्रेसनं घेतला महत्त्वाचा निर्णयमाझं वय आता जवळपास ७४ वर्षे आहे. मला कोरोना लसीची गरज आहे. मात्र माझे काही वैयक्तिक आणि सामाजिक आक्षेप आहेत. पंजाबचा (भारत) नागरिक म्हणून आणि जगाचा नागरिक म्हणून मी काही आक्षेप नोंदवू इच्छितो. या आक्षेपांमुळेच मी आतापर्यंत कोरोना लस घेतलेली नाही. मी आजही कोरोना लस घेण्यास उत्सुक नाही. कारण कोरोना लसीकरण केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोंचा लावण्यात आलेला आहे. हा फोटो प्रमाणपत्रावर अनिवार्य आहे, असं चमनलाल यांनी पत्रात नमूद केलं आहे.जगातील इतर कोणत्याही देशात लसीकरण प्रमाणपत्रावर राजकीय नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही, याकडे चमनलाल यांनी लक्ष वेधलं आहे. 'कोरोना लसीकरण हे राष्ट्रीय अभियान आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर आरोग्य अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असायला हवी. मात्र भारतातील असहाय जनतेला सत्तेतील नेत्याचा फोटो असलेलं प्रमाणपत्र दिलं जात आहे. याचा मी निषेध करतो. सत्ताधारी पक्षाच्या धोरणांमुळे आणि बेजबाबदारपणामुळेच देशात कोरोना बळी गेले आहेत. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सर्वस्वी केवळ देशातला सत्ताधारी पक्षच जबाबदार आहे,' अशा शब्दांत चमनलाल यांनी प्रमाणपत्रावरील फोटोबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसjnu - jawaharlal nehru universityजेएनयू