शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी 12 ते 16 आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागणार? समितीचा केंद्राला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 12:20 IST

Wait 12-16 weeks to take 2nd Covishield jab: आधी 30 दिवसांत लसीचा दुसरा डोस घेण्यास सांगणाऱ्या सरकारने नंतर हा कालावधी 45 दिवसांवर नेला होता. आता या अंतरात आणखी मोठी वाढ करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे अंतर 12 ते 16 आठवड्यांनी वाढणार आहे.

dosage interval for Covishield: देशात कोरोना लसीची प्रचंड टंचाई (Corona Vaccine Shortage) भासू लागली आहे. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस घेण्यासाठी वारंवार लसीकरण केंद्राच्या (Vaccination centers) चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे आधी 30 दिवसांत लसीचा दुसरा डोस घेण्यास सांगणाऱ्या सरकारने नंतर हा कालावधी 45 दिवसांवर नेला होता. आता या अंतरात आणखी मोठी वाढ करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे अंतर 12 ते 16 आठवड्यांनी वाढणार आहे. (The immunisation panel has recommended increasing the gap between two doses of Covishield vaccine to 12-16 weeks. No change in dosage interval for Covaxin has been suggested by the panel.)

Corona Vaccination: कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास विलंब होतोय? पुन्हा दोन डोस घ्यावे लागणार का? काय म्हणतात तज्ज्ञ....केंद्र सरकारची कोरोना सल्लागार समितीने सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली ऑक्सफर्डच्या कोव्हिशिल्डचा दुसरा डोस देण्याचा कालावधी वाढविण्याची शिफारस केली आहे. कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांनी वाढविण्यास सांगण्यात आले आहे. सध्या कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे चार ते आठ आठवड्यांचे करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचा कालावधी तसाच ठेवण्यात आला आहे. तो चार आठवड्यांचा आहे. 

CoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्लातसेच ज्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि जे बरे झाले आहेत त्यांनी देखील लगेचच कोरोना लस घेण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नसल्याचे या पॅनेलने म्हटले आहे. अशा लोकांनी बरे झाल्यापासून सहा महिन्यांनी लस घ्यावी, असे या NTAGI ने सुचविले आहे. प्रेग्नंट असलेल्या महिलांना कोणतीही लस निवडण्याची मुभा आहे. तसेच प्रसुती झाल्यानंतर महिला कधीही लस घेऊ शकतात, असे या पॅनेलने म्हटले आहे. 

ब्रिटन, कॅनडामध्ये किती आहे कालावधी?कोव्हॅक्सिन बनविणाऱ्या आयसीएमआरने 28 दिवसांचे अंतर ठेवण्यास सांगितले होते. मात्र, त्यापुढील दोन डोसमधील अंतरावर डेटा उपलब्ध नाही. तर कोव्हिशिल्ड वापरणाऱ्या ब्रिटनने दोन डोसमधील अंतर हे 12 आठवड्यांचे ठेवले आहे. कॅनडने हेच अंतर 16 आठवड्यांचे ठेवले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या