शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
2
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
3
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
4
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
5
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
6
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
7
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
8
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
9
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
10
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
11
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
12
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
13
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
14
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
15
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
16
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
17
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
18
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
19
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
20
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

Corona vaccination : लसींची निर्यात सुरू! चार देशांसाठी 10-10 लाख डोसला मंजुरी, सुत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 10:00 PM

Corona vaccination : इराणसाठी भारत-बायोटेकच्या कोवॅक्सिनचे एक दहा लाख डोस मंजूर केले आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीचे (Covid Vaccine) पुरेसे उत्पादन सुरू झाल्यानंतर आता केंद्र सरकार लसीची निर्यात (Export) पुन्हा सुरू करत आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला नेपाळ, म्यानमार, बांगलादेशला 'वॅक्सिन मैत्री' अंतर्गत 10 लाख कोविशील्ड डोस पाठवण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय, इराणसाठी भारत-बायोटेकच्या कोवॅक्सिनचे एक दहा लाख डोस मंजूर केले आहेत. (india will start covid vaccine export 10 lakh dose final for nepal bangladesh myanmar)

दरम्यान, गेल्या महिन्यात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले होते, 'वॅक्सिन मैत्री' अंतर्गत भारत संपूर्ण जगाला मदत करेल आणि चौथ्या तिमाहीत कोव्हॅक्समध्ये योगदान देईल. तसेच, पुढील महिन्यात कोरोनाविरोधी वॅक्सिनची 30 कोटीहून अधिक डोस मिळण्याची शक्यता आहे. जैविक ई (Biological E) आणि इतर कंपन्या त्यांच्या लस बाजारात आणत असल्याने लसीचे उत्पादन वाढेल.

दुसऱ्या लाटेनंतर लसीची निर्यात बंद करण्यात आली होतीयानंतर असे मानले जात होते की ऑक्टोबर महिन्यापासून लस निर्यात सुरू केली जाऊ शकते. दुसऱ्या मोठ्या लाटेचा प्रादुर्भाव झाल्यानंतर एप्रिल महिन्यात लसीची निर्यात बंद करण्यात आली. तेव्हापासून भारत सतत आपल्या गरजांकडे लक्ष देत आहे.

'सरकारच्या मंजुरीची वाट पाहत आहोत'गेल्या महिन्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनीही सांगितले होते की, लस निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रीन सिग्नलची ते वाट पाहत आहेत. ते म्हणाले होते की एसआयआयकडे बॅकलॉगमध्ये पडलेल्या अब्ज डॉलर्स (म्हणजे अनेक हजार कोटी) पेक्षा जास्त किमतीच्या लसीच्या डोसची ऑर्डर आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने लसीची निर्यात सुरू करण्याच्या भारताच्या निर्णयाचे कौतुक केले. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस अधनोम गेब्रेयेसुस म्हणाले होते की, भारताच्या या निर्णयामुळे सर्व देशांतील किमान 40 टक्के लोकसंख्येच्या लसीकरणाचे लक्ष्य वर्षाच्या अखेरीस साध्य करता येईल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या