शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसी पुरवणार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 19:48 IST

Corona vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता.

नवी दिल्ली - कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता. दरम्यान, आता पुढील महिन्यापासून भारत पुन्हा एकदा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसींचा पुरवठा करणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा केली आहे. (India to supply corona vaccine to worldwide from next month: Health Minister)

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबतची घोषणा करताना आज सांगितले की, देशामध्ये कोरोना विषाणूविरोधातील सुरू असलेल्या लसीकरणाच्या अभियानांतर्गत आतापर्यंत ८१ कोटींहून अधिक व्यक्तींना लसीचे डोस देण्यात आले आहे. त्यांनी सांगितले दरम्यान, १० कोटी डोस तर केवळ ११ दिवसांत दिले गेले, अशी माहितीही त्यांनी दिली.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी पुढे सांगितले की, व्हॅक्सिन मैत्रींतर्गत भारत संपूर्ण जगाला मदत करणार आहे. तसेच चौथ्या तिमाहीमध्ये कोव्हॅक्समध्ये योगदान देणार आहे. आम्हाला पुढच्या महिन्यात कोरोनाविरोधी लसींचे ३० कोटींहून अधिक डोस मिळण्याची अपेक्षा आहे. लसींचे उत्पादन वाढणार आहे. याचं कारण म्हणजे जैविक ई आणि इतर कंपन्या आपल्या लसी बाजारात आणणार आहेत. कोव्हॅक्स एक जागतिक पाऊल आहे, त्याला औपचारिकपणे कोविड-१९ लसीची जागतिक पुरवठा सुविधा म्हणून ओळखले जाते. मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांना कोरोनावरील लसीचे डोस वेळेत मिळावे, हे सुनिश्चित करणे हे याचे लक्ष्य आहे.

यादरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने सांगितले की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-१९ लसींचे आतापर्यंत ७९.५८ कोटींहून अधिक डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. मंत्रालयाने सांगितले की, १५ अजून डोसचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांजवळ वापर करण्यासाठी लसीचे ५.४३ कोटी डोस उरलेले आहे.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींची उपलब्धता वाढवून लसीकरण अभियानाला गती देण्यात आली आहे. जेणेकरून त्याद्वारे चांगली योजना बनवता येईल. तसेच लसींच्या पुरवठ्याची साखळ सुव्यवस्थित करता येईल. राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानांतर्गत केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-१९ विरोधी लसी निशुल्कपणे उपलब्ध करून दिले जातील. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय