शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: एक कायदा अन् भारताला मोठ्ठा फायदा; कोरोना लसींच्या किमतीत घट होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 13:24 IST

Corona Vaccination: कोरोना लस आणि औषधांच्या निर्मितीची किंमत कमी करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. मे महिन्यात तीनदा देशात चार लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र सध्या तरी कोरोना लसींची निर्यात, लस उत्पादकांचे करार यामुळे देशात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. देशाकडे लसींच्या निर्मितीची मोठी यंत्रणा असूनही नियमांमुळे उत्पादन वाढवता येत नाही अशी परिस्थिती आहे. मात्र यातून लवकरच मार्ग निघू शकेल. कोरोनाचा कहर सुरू असताना चीननं मोठा निर्णय घेतला; संपूर्ण जगालाच बसणार फटका?गेल्या वर्षी भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं जागतिक व्यापार संघटनेला (डब्ल्यूटीओ) एक प्रस्ताव दिला होता. या प्रस्ताव स्वामित्व कायद्यातून सूट देण्यासंदर्भात होता. कोरोना लसींच्या उत्पादनाला वेग देण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं डब्ल्यूटीओला प्रस्ताव देण्यात आला होता. कोरोनाशी संबंधित औषधांच्या उत्पादनांना गती देऊन विकसनशील आणि मागास राष्ट्रांना त्यावर अधिकार मिळावा हा हेतू यामागे होता. मात्र विकसित राष्ट्रांनी या प्रस्तावाला अनेक महिने विरोध केला.महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार?; दिलासादायक माहिती समोरगेले  कित्येक महिने प्रस्तावाला विरोध करणाऱ्या अमेरिकेनं आता विरोध मागे घेतला आहे. युरोपियन युनियन आणि न्यूझीलंडनंदेखील यासंदर्भात बातचीत करण्याची तयारी दर्शवली आहे. कोरोना लसी आणि औषधांवर संशोधन करणाऱ्या बऱ्याचशा संस्था आणि कंपन्या विकसित देशांमधील आहेत. त्यांच्याकडे यासंदर्भात बौद्धिक संपदा अधिकार आहेत. त्यामुळे लस आणि औषध उत्पादनाचे हक्क आहेत. त्यामुळे या कंपन्यांशिवाय इतर कोणीही औषध, लसींचं उत्पादन करू शकत नाही.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असल्यास लसीकरणाला पर्याय नाही. त्यामुळेच कोरोना लस आणि औषधं यांच्यासंदर्भात कंपन्यांकडे असलेल्या स्वामित्व अधिकारातून सूट दिली जावी असा भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा प्रस्ताव आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास जेनेरिक औषधांच्या निर्मितीला वेग मिळेल. विकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसींचं उत्पादन घेता येईल. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकेल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस