शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

corona vaccination : ‘सीरम’कडून लस विकत घेण्यास परवानगी द्या, युराेपियन समुदायाचे केंद्राकडे आर्जव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 06:30 IST

corona vaccination : भारतात काेराेनाच्या लसींचे सर्वाधिक उत्पादन हाेत आहे. त्यात ‘सीरम’ आघाडीवर आहे. मात्र, सर्वप्रथम देशाची गरज पूर्ण करणार आणि त्यानंतरच निर्यात करणार अशी भूमिका कंपनीने यापूर्वीच जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : युराेपमध्ये काेराेनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, फ्रान्ससह काही देशांमध्ये लाॅकडाऊन लागले आहे. त्यामुळे ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’कडून ‘ॲस्ट्राझेनेका’ने विकसित केलेल्या लसीचे १० काेटी डाेस विकत घेण्यास परवानगी देण्याची विनंती युराेपियन समुदायाने केंद्र सरकारकडे केली आहे. भारतात काेराेनाच्या लसींचे सर्वाधिक उत्पादन हाेत आहे. त्यात ‘सीरम’ आघाडीवर आहे. मात्र, सर्वप्रथम देशाची गरज पूर्ण करणार आणि त्यानंतरच निर्यात करणार अशी भूमिका कंपनीने यापूर्वीच जाहीर केली आहे. मात्र, पाश्चिमात्य देशांमध्ये काेराेनाच्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत युराेपमध्ये लसींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीसाठी युराेपियन देशांचे डाेळे भारताकडे लागले आहेत. लसविक्रीसाठी परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारवर युराेपियन समुदायाकडून दबावही वाढलेला दिसत आहे, तसेच ब्रिटनने  ‘सीरम’ला १ काेटी लसींची ऑर्डर दिली हाेती. त्यापैकी उर्वरित ५० लाख लसींचा पुरवठा करावा, यासाठी ब्रिटनकडून दबाव वाढत आहे.  युराेपियन समुदायाची मागणी भारताकडून मान्य हाेण्याची शक्यता कमीच आहे.  दिल्लीत २४ तासांमध्ये ५६ हजारांवर लोकांनी घेतली लस१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दिल्लीत तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी लोकांनी प्रचंड उत्साह दाखवला. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी ५६ हजार ५३१ जणांना लस देण्यात आली, तर शुक्रवारीही लसीकरणासाठी गर्दी होती. ...म्हणून ‘सीरम’कडे मागणीॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफाेर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे भारतात ‘सीरम’तर्फे उत्पादन करण्यात येत आहे. ॲस्ट्राझेनेकाच्या युराेपियन कारखान्यांमधून अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन हाेत आहे. त्यामुळे ‘सीरम’कडून लसीची मागणी करण्यात येत आहे. युराेपियन समुदायाच्या राजदूतांनी दाेन आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारला विनंतीचे पत्र पाठविले हाेते. याबाबत ‘सीरम’, तसेच केंद्र सरकारकडून अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय