शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

Corona Update: देशातील १८० जिल्ह्यांमध्ये गेल्या ७ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही; डॉ.हर्षवर्धन यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 16:21 IST

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीयरित्या वाढत होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत देशात दररोज ४ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीयरित्या वाढत होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत देशात दररोज ४ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. इतकंच नाही, तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचाही आकडा वाढतो आहे. देशात दररोज ४ हजार रुग्णांचा मृत्यू होतोय. 

देशात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक वेगळीच आणि सकारात्मक माहिती दिली आहे. देशात गेल्या ७ दिवसांमध्ये एकूण १८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर गेल्या तीन आठवड्यांची आकडेवारी पाहता देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये गेल्या २१ दिवसांपासून एकही नव्या कोरोना रुग्णाची भर पडलेली नाही. (corona update not a single new case of corona came from 180 districts in last 7 days said dr harsh vardhan)

गेल्या २४ तासांत १८ लाखांहून अधिक चाचण्याग्रूप ऑफ मिनिस्टर्सच्या (GoM) २५ व्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन संबोधित करत होते. "देशात सलग तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत ४ लाखांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४,०१,०७८ नवे रुग्ण आढळले आहेत. पण दुसरीकडे सकारात्मक बाब अशी की गेल्या २४ तासांत ३ लाख १८ हजार ६०९ रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरूप घरी देखील पोहोचले आहेत. आता देशाची एका दिवसाची चाचण्यांची क्षमता २५ लाख इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १८ लाख ८ हजार ३४४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत", असं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. 

देशात गेल्या २४ तासांत ४ हजार १८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंतचा एकूण मृत्यूंचा आकडा २ लाख ३८ हजार २७० वर पोहोचला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या २ कोटी १८ लाख ९२ हजार ६७६ इतकी झाली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या