शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर वाईट परिणाम होणार नाही, नीती आयोगाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 20:50 IST

corona virus third wave : जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्यात कोणतेही लक्षणे नसतील किंवा साधारण लक्षणे असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल, असेही डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

ठळक मुद्देतज्ज्ञ आणि सरकारकडून तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नवी दिल्ली : देशात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका आहे. मात्र, त्याचा परिणाम कमी असेल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. तसेच, जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्यात कोणतेही लक्षणे नसतील किंवा साधारण लक्षणे असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल, असेही डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. (corona third wave is not dangerous for children member of the policy commission dr v k paul claims)

तज्ज्ञ आणि सरकारकडून तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या दुसरी लाटेतील रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होत आहे. त्यामुळे ही लाट नियंत्रणात येत आहे, असे डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. तसेच, जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्यात कोणतेही लक्षणे नसतील किंवा साधारण लक्षणे असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल, असेही डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. 

(Uddhav Thackeray : "लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होतं, हे कोरोनानं दाखवून दिलं")

दरम्यान, अनेक वैद्यकीय तज्ञांच्या मते कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्याच्या आसपास भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. ही लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मध्यम स्वरुपाची असेल, असे म्हटले जात आहे. याशिवाय, काल कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत ही लाट येईल, येणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत सध्यातरी कुणी विश्वासपूर्वक काही सांगू शकत नाही. मात्र येणाऱ्या काळात विषाणूमध्ये म्युटेशन झाले तर त्याचा मुलांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे मुलांचा विचार करू इंफ्रास्ट्रक्चर तयार करणे गरजेचे आहे.  

(Mucormycosis : दिल्लीतील दोन रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचा दुर्मीळ संसर्ग, चिंता वाढली)

ब्लॅक फंगसवरील औषधाचे उत्पादन वाढविणारदेशात कोरोना महामारीनंतर आता आणखी एका आजाराने हाहाकार माजला आहे. या आजाराला बर्‍याच राज्यांत महामारी घोषित केली आहे. ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस असे या आजाराचे नाव आहे. या आजारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. ब्लॅक फंगसवर परिणामकारक औषध एम्फोटेरिसीन-बीच्या (Amphotericin B) मुबलक पुरवठ्यासाठी पाच कंपन्यांना उत्पादनासाठी परवानगी दिली आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMucormycosisम्युकोरमायकोसिस