शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकमध्ये दिल्लीत कोरोनाची वाढ, एकाच दिवसात 2877 पॉझिटीव्ह तर 65 मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 08:48 IST

देशात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण गेल्या २४ तासांत आढळले आहेत. देशात १ जून ते १८ जून या काळात तब्बल १ लाख ७६ हजार ४११ नवे रुग्ण आढळले असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे

नवी दिल्ली - केंद्र सरकारने देशातील लॉकडाउन हटवून अनलॉकचा टप्पा सुरु केल्यानंतर राजधानी दिल्ली व मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात तब्बल 2877 नवीन रुग्ण आढळले असून आजपर्यंतचा हा एका दिवसातील रुग्णवाढीचा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे अनलॉकमध्ये दिल्लीकरांची डोकेदुखी वाढल्याचं दिसून येतंय. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२ हजार ८८१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या  लाख ६६ हजार ९४६ झाली आहे. तसेच, २४ तासांत ३३४ जण मरण पावल्यामुळे मरणाऱ्यांची संख्या १२ हजार २३७ झाली आहे.

देशात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण गेल्या २४ तासांत आढळले आहेत. देशात १ जून ते १८ जून या काळात तब्बल १ लाख ७६ हजार ४११ नवे रुग्ण आढळले असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मृत्यूचे प्रमाणही २.८ वरून ३.३ वर गेले असून, ही चिंतेची बाब आहे. मात्र, बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असून, आतापर्यंत १ लाख ९४ हजार ३२४ रुग्ण (प्रमाण ५२.९५) बरे होऊ न घरी परतले आहेत आणि सध्या १ लाख ६0 हजार ३८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे गुरुवारी देण्यात आली. राजधानी दिल्लीनेही एकाच दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड आज मोडला आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात तब्बल 2877 नवीन रुग्ण आढळले असून एकाच दिवसात 65 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत आजपर्यंत 49,979 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून 21,341 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत 1969 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 

दरम्यान जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूंचे प्रमाण अतिशय कमी असून, मृत्यूदरात भारत जगामध्ये आठव्या स्थानी आहे. कोरोनाच्या एकूण बळींपैकी ७0 टक्के रुग्णांना अन्य काही ना काही आजार होते, असे आढळून आले आहे. त्यामुळे अन्य काही आजार असणाऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकवार स्पष्ट केले आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी १ लाख १६ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील असून, त्याखालोखाल तमिळनाडू (५0 हजार) दिल्ली (४७ हजार), गुजरात (२५ हजार) आणि उत्तर प्रदेश (१४ हजार ५00) या राज्यांचा क्रमांक लागतो. देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोनाचे रुग्ण आहे. त्यामुळे, राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईतील वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीHealthआरोग्य