शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

Corona New Variant Omicron: दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित; क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 20:01 IST

Two passengers corona Positive in Bengaluru: या रुग्णांचा अहवाल येण्यासाठी ४८ तास लागणार आहेत. दोघांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने जगभरात खळबळ उडविलेली असताना भारतात दक्षिण आफ्रिकेहून आलेले दोन प्रवासी कोरोना बाधित आढळले आहेत. बंगळुरूच्या विमानतळावर तपासणीवेळी दोन प्रवासी कोरोना बाधित सापडले. यामुळे बंगळुरु विमानतळावर, आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली होती. 

बंगळुरुच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे रुग्ण सापडले. बेंगळुरू ग्रामीण उपायुक्त के. श्रीनिवास यांनी शनिवारी सांगितले की, या दोघांना नव्या कोरोना व्हायरसची, ओमीक्रॉनची लागण झालीय की नाही हे तपासणी अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. या रुग्णांचा अहवाल येण्यासाठी ४८ तास लागणार आहेत. दोघांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. जोवर ते नव्या व्हेरिअंटने बाधित आहेत की नाहीत हे समोर येत नाही, तोवर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्येच ठेवले जाणार आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

श्रीनिवास म्हणाले की, आतापर्यंत १० हाय रिस्क देशांमधून ५८४ प्रवासी बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी ९४ प्रवासी हे एकट्या द. आफ्रिकेतून आलेले आहेत. विमानतळावरील तपासणीच्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी श्रीनिवास  गेले होते. 

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले आहेत. प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या..

CoronaVirus Updates: नवा व्हेरिअंट ‘ओमीक्रॉन’ डेल्टासोबत मिसळला तर...; भारतासाठी वैज्ञानिकांचा गंभीर इशारा

Corona New Variant Omicron: HIV पासून नव्या कोरोना व्हेरिअंटची उत्पत्ती? वैज्ञानिकाच्या दाव्याने उडाली खळबळ

CoronaVirus Updates: भयावह! कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटसमोर लस, बूस्टर डोस...सर्व फेल; WHO ने व्यक्त केली चिंता

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBengaluruबेंगळूरOmicron Variantओमायक्रॉन