शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:49 IST

Coronavirus Outbreak in India: आता देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळपास जाऊन पोहोचला आहे.

Coronavirus Outbreak:  कोरोना व्हायरस पुन्हा एकदा देशभरात हात-पाय पसरताना दिसत आहे. आता देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळपास जाऊन पोहोचला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, रविवारपर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या 3758 एवढी होती. तर मृतांचा आकडा 28 एवढा होता. दिल्लीचा विचार करता, दिल्लीतील सक्रीय रुग्णांची संख्या 436 वर पोहोचली आहे. येथे 61 रुग्ण वाढले आहेत. तसेच, उत्तर प्रदेशातील सक्रीय रुग्ण संख्या 149 तर महाराष्ट्रातील सक्रीय रुग्ण संख्या 506 एवढी आहे.

महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात कोरोनाचे ६५ नवीन रुग्ण आढळले. यांपैकी मुंबईत २२ रुग्ण, पुण्यात २५, ठाण्यात ९, पिंपरी-चिंचवडमध्ये ६, कोल्हापुरात २ तर नागपुरात एक रुग्ण आढळला आहे. यातच दिलासादायक गोष्ट म्हणजे, राज्यात ३०० रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या, सक्रिय कोरोना रुग्णांची एकूण संख्या 506 वर पोहोचली आहे.

राजस्थानातही वाढतायत रुग्ण - राजस्थानातही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढताना दिसत आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत २० नवीन रुग्ण आढळले. नवीन रुग्णांपैकी १७ जण राजधानी जयपूरमधील आहेत. तर उदयपूर, बिकानेर आणि डुंगरपूरमधील प्रत्येकी एक आहेत. नवीन रुग्णांमध्ये ७४ आणि ८२ वर्षे वयोगटातील दोन वृद्धांचा समावेश आहे. याशिवाय १९ ते ३० वर्षे वयोगटातील ७ तरुणांचा समावेश आहे. २० नवीन रुग्णांसह, राजस्थानमध्ये आतापर्यंत ९८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एका संक्रमिताचा मृत्यू झाला आहे. तर १५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस