शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Guideline : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 16:47 IST

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यामुळे रेल्वे पुन्हा एकदा कोरोना प्रोटोकॉल नियमांच्या पालनासंदर्भात निर्णय घेत आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या मंडळींना आता पुन्हा एकदा कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे. कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता, रेल्वेने (Indian Railways) प्रवासादरम्यान पुन्हा एकदा मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक पॅसेंजर नीरज शर्मा यांनी सर्व झोनच्या चीफ कमर्शियल मॅनेजर्सना (CCM) पत्र पाठवून, यासंदर्भात सूचना दिली आहे. "रेल्वे प्रवासादरम्यान मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोरोना प्रोटोकॉलचे पान करण्यात यावे," असे या पत्राक म्हणण्यात आले आहे.

मास्कचा वापर न करणाऱ्यांना भरावा लागेल दंड - यासंदर्भात रेल्वेने म्हटले आहे, की केंद्रीय गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने कोरोनासंदर्भात, 22 मार्च रोजी जारी केलेल्या एसओपीचे पालन करण्यात यावे. तसेच, विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईही केली जाऊ शकते. रेल्वे बोर्डाने सर्व गाड्या आणि स्थानक परिसरांतही प्रवाशांना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मास्क घालण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे.

तत्पूर्वी, कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर, रेल्वेने मास्क वापरासंदर्भात प्रवाशांना सूट दिली होती. यानंतर, प्रवाशांना विनामास्कदेखील रेल्वेने प्रवास करता येत होता. तसेच रेल्वेमध्ये पूर्वी प्रमाणेच पॅनट्री आणि बेडिंग देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यामुळे रेल्वे पुन्हा एकदा कोरोना प्रोटोकॉल नियमांच्या पालनासंदर्भात निर्णय घेत आहे. याचाच एक भाग म्हणून आता पुन्हा एकदा रेल्वे प्रवासादरम्यान मास्क अनिवार्य करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसrailwayरेल्वे