शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

देशात कोरोनामुळे १ ऑगस्टपर्यंत दहा लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता, ‘लॅन्सेट’चा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 03:07 IST

भारतामध्ये कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या शनिवारपर्यंत २ लाख ३८ हजार २७० होती. देशामध्ये १ ऑगस्टपर्यंत १० लाख किंवा त्याहून अधिक माणसांचा कोरोनाने मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन (आयएचएमई) या संस्थेने म्हटले आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संसर्गामुळे येत्या १ ऑगस्टपर्यंत १० लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे ब्रिटनमधील प्रख्यात वैद्यकीय नियतकालिक ‘लॅन्सेट’ने म्हटले आहे. जर अशी स्थिती ओढवली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे ते सर्वांत मोठे अपयश असेल, असेही या नियतकालिकाने आपल्या संपादकीयात म्हटले आहे. (Corona is expected to kill one million people in the country by August 1, says Lancet)भारतामध्ये कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या शनिवारपर्यंत २ लाख ३८ हजार २७० होती. देशामध्ये १ ऑगस्टपर्यंत १० लाख किंवा त्याहून अधिक माणसांचा कोरोनाने मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन (आयएचएमई) या संस्थेने म्हटले आहे. आरोग्य क्षेत्रातील घडामोडींवर संशोधन करणारी ही जागतिक दर्जाची स्वतंत्र संस्था आहे. तिने केलेल्या भाकिताचा हवाला देत लॅन्सेट नियतकालिकाने म्हटले आहे की, कोरोनावर प्रारंभीच्या काळात मिळविलेल्या यशाने भारताचा वारू उधळला होता. कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या कृती गटाची त्यामुळे एप्रिलपर्यंत बैठकच झाली नव्हती.

लॅन्सेटच्या संपादकीय म्हटले आहे की, कोरोना साथीची स्थिती हाताळताना आपल्या हातून झालेल्या चुका मोदी सरकारने मान्य करून आता अतिशय पारदर्शकपणे धोरणे राबविली पाहिजेत. हे धोरण द्विस्तरीय असावे. सध्याच्या भोंगळ पद्धतीने राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेतील सर्व त्रुटी भारताने दूर कराव्यात व या मोहिमेचा वेग वाढवावा. 

भूलथापा मारण्यात मश्गूल-    लॅन्सेट नियतकालिकाने म्हटले आहे की, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो असे वारंवार इशारे देण्यात येऊनही मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे असे कार्यक्रम, जाहीर सभांमध्ये लाखो लोक उपस्थित राहिले. त्यामुळे कोरोना संसर्ग प्रचंड फैलावला.-    भारत सामूहिक प्रतिकारशक्तीच्या जवळ आला आहे असे काही जण सांगत होते; पण त्यात काही तथ्य नाही. आपल्यावर होत असलेल्या टीकेबाबत गंभीरपणे विचार करण्याऐवजी मोदी सरकार कोरोना साथ कशी नियंत्रणात आणली याच्या ट्विटरवरून भूलथापा मारण्यात मश्गूल होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतhospitalहॉस्पिटलOxygen Cylinderऑक्सिजन