शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

विशिष्ट प्रकारच्या यूव्ही किरणांमुळे नष्ट होतो कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 5:46 AM

महत्त्वाचा शोध; जागा निर्जंतूक करण्यासाठी प्रभावी उपाय

वॉशिंग्टन : कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्याचे प्रयोग कधी यशस्वी होणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले असतानाच विशिष्ट प्रकारच्या अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किरणांमुळे कोरोनाचा विषाणू नष्ट करता येतो असा महत्त्वपूर्ण शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.

कोरोना रुग्णाच्या उपचारात विशिष्ट प्रकारच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर केल्याने त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. सार्वजनिक ठिकाणे निर्जंतूक करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर उपयोगी ठरू शकतो असेही या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले आहे. अमेरिकन जर्नल आॅफ इन्फेक्शन कंट्रोल या नियतकालिकात या संशोधनाबद्दलचा लेख प्रकाशित झाला आहे.

त्यात म्हटले आहे की, २२२ एम-यूव्हीसी या किरणांद्वारे कोरोनाचा विषाणू नष्ट करता येतो तसेच या किरणांच्या वापरामुळे माणसाच्या त्वचेवरही विपरित परिणाम होत नाही. या विशिष्ट प्रकारच्या किरणांचा उपयोग याआधी वेगळ््या प्रकारचे कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी करण्यात आला होता. मात्र

सार्स-कोव्ह-२ प्रकारचे कोरोनाविषाणू नष्ट होतात की नाही याबाबत मात्र प्रयोग करण्यात आले नव्हते.२२२ एनएम यूव्हीसी ही किरणे २५४ एनएम यूव्हीसी किरणांपेक्षा कमी हानीकारक आहेत.घातक विषाणू व जंतू नष्ट करण्यासाठी २२२ एनएम यूव्हीसी किरणे उपयोगी आहेत. यासंदर्भात शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात या किरणांमुळे सार्स-कोव्ह-२ या प्रकारातील कोरोना विषाणूंपैकी ९९.७ टक्के विषाणू नष्ट झाल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरोना साथ नष्ट करण्यासाठी महत्त्वाचा उपाय सापडला असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला. या किरणांमुळे माणसाचा डोळा किंवा त्वचेला कोणतीही इजा होत नाही.

माणसांच्या पेशींवरही दुष्परिणाम नाहीमाणसाच्या शरीरातील जिवंत पेशींवरही २२२ एनएम-यूव्हीसी किरणांचा दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे रुग्णालयांपासून अनेक ठिकाणी जागा निर्जंतूक करण्यासाठी या प्रकारच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा उपयोग भविष्यात होऊ शकतो असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या