शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकट : इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन यांची पुणे, मुंबई भेट अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 06:36 IST

Coronavirus: कोरोना विषाणूची साथ महाराष्ट्रात वेगाने फैलावत असून रुग्ण सकारात्मक निघण्याचे प्रमाण १४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची पुणे व मुंबई भेट अडचणीत आली आहे. 

- हरीश गुप्तानवी दिल्ली : कोरोना विषाणूची साथ महाराष्ट्रात वेगाने फैलावत असून रुग्ण सकारात्मक निघण्याचे प्रमाण १४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची पुणे व मुंबई भेट अडचणीत आली आहे. जॉन्सन एप्रिल २६-२७ रोजी नवी दिल्लीला भेट देणार असून ते पुणे, मुंबईलाही भेट देण्याचा विचार करीत आहेत. पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ही जगातील सगळ्यांत मोठी लस उत्पादक कंपनी असून, पुणे शहराला भेट देण्यास जॉन्सन उत्सुक आहेत. एसआयआय ऑक्सफोर्ड ॲस्ट्राझेनेकाची लस कोविशिल्डचीही निर्मिती करीत आहे. ही लस तेथून जगातील अनेक देशांना निर्यात केली गेली आहे. ब्रिटिश अधिकारी जॉन्सन यांची पुणे भेट व्हावी यासाठी भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. बोरिस जॉन्सन यांनी भारताला भेट देण्याचा विचार करण्याची ही दुसरी वेळ आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास जॉन्सन हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. परंतु, इंग्लंडलाच कोविडच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसला. तेथे लॉकडाऊन लागू करावे लागले. त्याचा परिणाम म्हणून त्यांचा भारत दौरा रद्द झाला.इंग्लंडमध्ये परिस्थितीत सुधारणा होत असल्यामुळे आणि भारताला कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला नाही तर एप्रिलमध्ये जॉन्सन यांचा दौरा निश्चित केला गेला आहे. तथापि, देशात ज्या आठ राज्यांत कोरोनाचा कहर सुरू आहे त्यात महाराष्ट्र आहे. सर्वांत जास्त कोरोना रुग्ण नोंदवले जात आहेत त्या जिल्ह्यांत पुणे आणि मुंबई आहे. शुक्रवारपासून पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे.  

टॅग्स :Boris Johnsonबोरिस जॉन्सनEnglandइंग्लंडcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत