शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

Coronavirus : मे महिन्याच्या अखेरिस भारत १.४ कोटींची संख्या पार करण्याची शक्यता; संशोधनातून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 7:50 AM

कोरोनाची दुसरी लाट देशात झपाट्यानं वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद

ठळक मुद्देकोरोनाची दुसरी लाट देशात झपाट्यानं वाढत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद

गेल्या काही दिवसांपासू देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. दरम्यान, जर हीच परिस्थिती कायम राहिली तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या १.४ कोटींवर जाईल असा अंदाज झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान बंगळुरू येथील इंडियन इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सनं (IISC) वर्तवला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या मध्यावधीत कोरोना विषाणूचा पीक असू शकतो आणि यावेळी उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या ७.३ लाखांवर जाऊ शकते. तसंच या संशोधनानुसार अधिक बिकट परिस्थितीत मे महिन्याच्या अखेरिस उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या २० लाखांपर्यंतही पोहोचू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु जर लोकांचं लसीकरण केलं आणि कोरोना नियमांचं पालन केलं तर याला आळा घातला जाऊ शकतो, असंही यात वर्तवण्यात आलं आहे. IISC चे प्राध्यापक शशिकुमार आणि दीपक यांचा हा अंदाज कोरोनाच्या सध्याच्या ट्रेंडवर अवलंबून आहे. या अंदाजानुसार केवळ कर्नाटकातच एप्रिल अखेरपर्यंत या केसेसची संख्या १०.७ लाखांपर्यंत पोहोचू शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार वेगानं होताना दिसत आगे. तसंच आदल्या दिवसाच्या तुलनेत त्याच्या दुसऱ्या दिवशी जवळपास ९ हजार अधिक केसेस नोंदवल्या जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार शनिवारी २४ तासांमध्ये देशात ८९,१२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर दुसरीकडे ७१४ जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत एकूण १ कोटी २३ लाखांच्यावर रुग्णांची नोंद झाली आहे. तर शनिवारपर्यंत देशात १ लाख ६४ हजारांच्यावर मृत्यू आणि ६ लाख ५८ हजारांच्यावर अॅक्टिव्ह केसेसचीही नोंद झाली. देशात ३ एप्रिल रोजी संध्याकाळपर्यंत एकू ७.४४ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. दरम्यान, देशातील सर्वाधिक केस या महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये नोंदवल्या देल्या आहेत. शनिवारी राज्यात कोरोनाबाधितांची विक्रमी नोंदराज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. शनिवारी राज्यात तब्बल ४९ हजार ४४७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ३७ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारची आकडेवारी ही राज्याची चिंता वाढवणारी आहे. (Maharashtra reports 49,447 new coronavirus case and 277 deaths in the last 24 hours)राज्यात शनिवारी ४९,४४७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर दुसरीकडे  ३७,८२१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात शनिवारपर्यंत एकूण ४०११७२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८४.४९% इतकं झालं आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतBengaluruबेंगळूरResearchसंशोधन