शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

शंख वाजवून कोरोनाला पळवा म्हणणाऱ्या भाजपा खासदाराला कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 16:00 IST

केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अर्जुन मेघवाल यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी भाभीजी पापड खाण्याचा सल्ला दिला होता. तर, चिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला  या खासदारांनी दिला.

ठळक मुद्देचिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी दिला होता.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांकडून लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाला पराभूत करण्यासाठी भाजपाचे अनेक नेते वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत. चिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी दिला होता. मात्र, संसदेच्या अधिवेशनापूर्वीच झालेल्या चाचणीत हेच खासदार महाशय कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. 

केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अर्जुन मेघवाल यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी भाभीजी पापड खाण्याचा सल्ला दिला होता. तर, चिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी दिला होता. खासदारांचा हा सल्ला चर्चेचा विषय ठरला होता. खासदार सुखबीरसिंह यांचा या विधानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये, ते चिखलात अंघोळ करत शंख वाजवताना दिसले. तसेच, व्हिडिओमध्ये ते असेही म्हणत आहेत की, "कोरोना ज्या दिवशी सुरू झाला होता, त्या दिवशी मी आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवण्यास सांगितले होते. ही औषधे खाल्ल्याने वाढणार नाही. आपल्याला नैसर्गिक मार्गाने प्रतिकारशक्ती मिळेल. तुम्ही फिरायला जा, पावसात जा, चिखलात बसा. शेतातही काम करा, पायी चालत जा आणि शंख वाजवा, या गोष्टी प्रतिकारशक्ती वाढते." मात्र, खासदार महाशयांचा हा दावा फोल ठरल्याचे सिद्ध झाले आहे. 

संसदेचे पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून, त्या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचणीत तब्बल 30 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे संसदेतील 50 पेक्षा जास्त कर्मचारीही कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेल्या खासदारांच्या नावांमध्ये भाजपा खासदार सुखबीरसिंह जौनापुरिया यांचाही समावेश आहे.  

अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्यानुसार, खासदारांची चाचणी केली असता, त्यामध्ये तब्बल 30 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर, तब्बल 50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्या रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. ज्या खासदार आणि कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, त्यांना विलगीकरणात राहण्याचे सांगण्यात आले आहे, तसेच अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित न राहण्याचेही सूचवले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याMember of parliamentखासदारTwitterट्विटर