संसदेतील 30 खासदारांना कोरोना, 50 कर्मचाऱ्यांचीही टेस्ट पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 06:17 PM2020-09-14T18:17:41+5:302020-09-14T20:12:01+5:30

कोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपाचे खासदार आहेत. आज सकाळी या सर्वच खासदारांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संसद परिसरात कोरोनाची चर्चाही चांगलीच रंगली आहे.

Corona to 30 MPs in Parliament, also test positive to 50 staff before session | संसदेतील 30 खासदारांना कोरोना, 50 कर्मचाऱ्यांचीही टेस्ट पॉझिटीव्ह

संसदेतील 30 खासदारांना कोरोना, 50 कर्मचाऱ्यांचीही टेस्ट पॉझिटीव्ह

Next
ठळक मुद्देकोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपाचे खासदार आहेत. आज सकाळी या सर्वच खासदारांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संसद परिसरात कोरोनाची चर्चाही चांगलीच रंगली आहे.

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, त्या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचणीत पाच खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर, एकूण 17 खासदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. आता, पॉझिटीव्ह खासदारांच्या संख्येत आणखी वाढ झाली असून तब्बल 30 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे संसदेतील 50 पेक्षा जास्त कर्मचारीही कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. 

अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्यानुसार, खासदारांची चाचणी केली असता, त्यामध्ये तब्बल 30 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर, तब्बल 50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्या रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. ज्या खासदार आणि कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, त्यांना विलगीकरणात राहण्याचे सांगण्यात आले आहे, तसेच अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित न राहण्याचेही सूचवले आहे. 

कोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपाचे खासदार आहेत. आज सकाळी या सर्वच खासदारांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संसद परिसरात कोरोनाची चर्चाही चांगलीच रंगली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात येत असून त्यातील काही मंत्र्यांच्या चाचण्या अद्याप बाकी आहेत. अधिवेशन सुरू होण्याच्या ३ दिवस आधी खासदारांना कोरोना चाचणी करून घ्यावी, असे त्यांना सांगण्यात आले होते. 
संसदेतही सोशल डिस्टन्स 

अधिवेशनाआधीची सर्वपक्षीय बैठक कोरोना साथीमुळे यंदा रद्द करण्यात आली. बैठकीची संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तयारी केली होती. कोरोना साथीमुळे प्रश्नोत्तराच्या तासाचा कालावधी अर्ध्या तासावर आणण्यात आला आहे. प्रश्नांची उत्तरेही लेखी स्वरूपात दिली जातील. फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याने राज्यसभा चेंबर, गॅलरी, लोकसभा चेंबर येथे खासदारांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. सभागृहाचे कामकाज व सदस्याचे भाषण नीट ऐकता यावे यासाठी दोन्ही सभागृहांच्या गॅलरीमध्ये स्क्रीन लावण्यात आले आहेत. दरम्यान, अधिवेशानाच्या दोन दिवस अगोदरच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपचारांसाठी शनिवारी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी हेही गेले असल्याने दोन्ही नेते काही दिवस लोकसभेत नसतील. त्यामुळे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची जबाबदारी वाढली आहे.  

Web Title: Corona to 30 MPs in Parliament, also test positive to 50 staff before session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.