शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

८0 देशांत कोरोना; भारतात ३0 रुग्ण; अनेक कार्यक्रम रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 06:02 IST

कोरोनाचा भारतीयांना संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू असले तरी अफवांमुळे लोक धास्तावून गेले आहेत.

नवी दिल्ली/मुंबई/पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग आता ८0 देशांत झाला असला तरी चीनमधील मृतांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. जगभरातील कोरोनाच्या बळींची संख्या ३२00 वर गेली असून, भारतात रुग्णांचा आकडा ३0 आहे. कोरोनाचा भारतीयांना संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू असले तरी अफवांमुळे लोक धास्तावून गेले आहेत.दिल्लीत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्राथमिक शाळांना ३१ मार्चपर्यंत सुटी देण्यात आली आहे. दिल्लीत व देशाच्या अन्य भागांतही होळीसह जवळपास सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले आहेत.देशातील अनेक सरकारी व खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे उपाय योजले आहेत. संसदेत खा. नवनीत राणा गुरुवारी तोंडावर मास्क लावून आल्या होत्या, तर काही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हातमोजे घातले होते. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण मास्क घालून फिरताना दिसत आहेत. त्या विशिष्ट मास्कचा काळाबाजार सुरू असून, तो २५0 ते ५00 रुपयांना विकला जात आहे.>यंदाची आयपीएल कोरोनामुळे रद्द?मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याने २९ मार्चपासून सुरू होणाºया आयपीएलवर कोरोनाचे सावट असून ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या निमित्ताने देशभरातील स्टेडियमवर प्रचंड गर्दी होणार आहे. कोरोनाच्या दृष्टीने पुढचे १५-२० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा वेळी आयपीएलसाठी होणाºया गर्दीने अडचणी वाढू शकतात. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते.>लोकांनी घाबरू नये - मुख्यमंत्रीकोरोनाबाबत राज्य सरकारने पुरेशीखबरदारी घेतली असून, लोकांनी घाबरू नये. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, मर्यादेत होळी साजरी करा, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. कोरोना संसर्गाचा परिणाम आयटी क्षेत्रावरही दिसत आहे. पुण्यातील आयटी कंपन्यांनी कर्मचाºयांना घरून काम करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना