शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Coromandel Express Accident: भयावह! कोरोमंडल एक्सप्रेस अपघातातील मृतांचा आकडा वाढला, ५० जणांचा मृत्यू, ३५० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 23:46 IST

Coromandel Express Accident: ओदिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. बालासोरमधील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर होऊन झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढली आहे.

ओदिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. बालासोरमधील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर होऊन झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातात आतापर्यंत ३५० जण जखमी झाले आहेत. तर ५० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र रेल्वेकडून याबाबतचा कुठलाही अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही आहे. जखमींना सोरो सीएचसी, गोपालपूर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. शोध आणि बचाव अभियानासाठी पथके घटनास्थळावर दाखल झाली आहेत. तसेच ओदिशा फायर आणि एमर्जंन्सी सर्व्हिसच्या २६ सदस्यांची एक अतिरिक्त बचाव टीमसुद्धा पाठवण्यात आली आहे.

या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना २ लाख आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे. मदत कार्यामध्ये सुमारे ५० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्याचे ओदिशाच्या मुख्य सचिवांनी सांगितलं आहे. जखमींनी बसमधून रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ओदिशामध्ये झालेल्या ट्रेन अपघातामुळे मी दु:खी आहे. दु:खाच्या क्षणी माझ्या संवेदना शोकमग्न कुटुंबांसोबत आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, ही प्रार्थना. दरम्यान, मोदींनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून परिस्थितीबाबत माहिती घेतली आहे.

या अपघातानंतर एसडीएएच-पुरी दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर पर्याय म्हणून चार ट्रेन टाटा-जेआरएलआय मार्गावरून फिरवण्यात आल्या आहेत.  

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेOdishaओदिशा