तापी गॅस पाईपलाईनची कोनशिला
By Admin | Updated: December 13, 2015 22:40 IST2015-12-13T22:40:40+5:302015-12-13T22:40:40+5:30
भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ व तुर्कमेनिस्तान व अफगाणिस्तानच्या नेत्यांनी रविवारी तापी गॅस पाईपलाईनची कोनशिला बसविली.

तापी गॅस पाईपलाईनची कोनशिला
मेरी, तुर्कमेनिस्तान : भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ व तुर्कमेनिस्तान व अफगाणिस्तानच्या नेत्यांनी रविवारी तापी गॅस पाईपलाईनची कोनशिला बसविली. भारतातील वीज उत्पादक यंत्रांना गॅसपुरवठा करण्याऱ्या तुर्कमेनिस्तान- अफगाणिस्तान- पाकिस्तान- भारत गॅस पाईपलाईनला ७.६ अब्ज डॉलर खर्च येण्याची शक्यता आहे.
हा समारंभ राजधानी अशगाबादपासून ३११ कि.मी.वर असलेल्या मेरी या प्राचीन शहरी झाला. हे शहर पूर्वीच्या ऐतिहासिक रेशीम मार्गावर आहे. १,८०० कि.मी. लांबीची ही पाईपलाईन २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या योजनेच्या पूर्णत्वानंतर उभय देशांना याचा फायदा होणार असून व्यापारविषयक देवाण-घेवाण गतीमान होणार आहे. (वृत्तसंस्था)