अधिवेशन-गॅलरीतून

By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:02+5:302015-03-25T21:10:02+5:30

मुनगंटीवारांची दोन तास बॅटींग

From the convention-gallery | अधिवेशन-गॅलरीतून

अधिवेशन-गॅलरीतून

नगंटीवारांची दोन तास बॅटींग
विधानसभेत एकनाथ खडसे बोलायला उभे राहिले आणि बोलता बोलता त्यांनी खिशात हात घातला की सगळे समजून जायचे आता तासभर तरी खडसे माईक सोडणार नाहीत... अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा अजून तसा अंदाज यायचा आहे. अर्थसंकल्प मांडण्यास त्यांनी दोन तास घेतले आणि त्यावरील चर्चेला उत्तर देतानाही जवळपास तेवढाच वेळ घेतला. खाली बसून कोणी काही बोलले तरी सुधीरभाऊ उत्तर देतायत हे लक्षात येताच बसून बोलणार्‍यांची संख्या वाढू लागली तसे भाषणं ही लांबू लागले. शेवटी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करुनही फार फरक पडला नाही... उलट कोकणाच्या प्रश्नावर पहिली मंत्रीमंडळाची बैठक थेट कोकणात घेऊन टाकू... असेही त्यांनी घोषीत केले आणि नंतर बरोबरयं ना मुख्यमंत्रीजी.. असा प्रतीसवाल मुख्यमंत्र्यांनाच केला तेव्हा हात जोडून मान डोलावण्यापलिकडे त्यांच्याही हाती काही उरले नव्हते... त्यांच्याच या काही कोट्या...
कोणी पिता बदलत नाही..!
छगन भुजबळ यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणात काही बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुनगंटीवारांनी भुूजबळांना आठवण करुन दिली. बाळासाहेब ठाकरे आपल्याला पित्यासमान आहेत... असे भुजबळांच्या आवाजाची नक्कल करीत मुनगंटीवार म्हणाले, कोणी कितीही श्रीमंत असला तरी आपला पिता बदलत नाही... आणि या विधानाला सत्ताधारीबाकावरुन जोरदार समर्थन मिळाले नाही तरच आ›र्य...
वानरास पुच्छ...
बजेट विरोधकांनाकसे समजले नाही हे सांगताना अर्थमंत्री म्हणाले, वानरास पुच्छ, तीन हत्तीस दंत सहा... असे सुभाषित होते. मात्र त्यातला अर्धविराम न वाचणारे म्हणाले, वानरास तीन शेपट्या आणि हत्तीला सहा दात आहेत... अर्धविराम नीट वाचला असता तर बरे झाले असते असेही सांगायला ते विसरले नाहीत...
बँकेत जाणारे दोघे...
यशोमती ठाकूर यांनी जुन्याच बाटलीत नवी दारु असे वर्णन अर्थसंकल्पाचे केले होते त्यावर अर्थमंत्र्यांनी राम आणि शामची कथा सांगितली. हे दोघे मित्र. दोघेही म्हणाले म्हणे, अरे माझे वडील बँकेत पैसे काढायला गेले आणि पोलिसांनी त्यांना पकडले... दुसरा म्हणाला माझेही वडील बँकेत पैसे काढायला गेले आणि त्यांनाही पकडले. त्यावर राम म्हणाला, अरे माझे वडील सकाळी बँकेच्या वेळत स्लीप घेऊन पैसे काढायला गेले होते... तुझे वडील रात्री बँक बंद झाल्यावर पैसे काढायला गेले होते... त्यावरही सभागृह हास्यात बुडाले...
प्रणिती शिंदे आणि गोहत्याबंदी
गोहत्या बंदीवरुन अर्थमंत्र्यांनी प्रणिती शिंदे यांना काही दाखले दिले. ते म्हणाले, मोतीलाल व्होरा, ॲड. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी गोहत्या बंदीची मागणी केली होती. हा कायदा आंध्राने लागू केला तेथे काँग्रेसचे सरकार होते. देशातही काँग्रेसचेच सरकार होते,जेव्हा हा कायदा मंजूर झाला होता... त्यावर प्रणिती शिंदे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला खरा पण आपण महात्मा गांधींचा वारसा चालवता की... अन्य कोणाचा... असा सवालही त्यांनी करुन गदारोळ उडवून दिला...
- अतुल कुलकर्णी

Web Title: From the convention-gallery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.