अधिवेशन-१ (तटकरे)

By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:03+5:302015-07-15T00:15:03+5:30

Convention -1 (Tatkare) | अधिवेशन-१ (तटकरे)

अधिवेशन-१ (तटकरे)

>आवाज चढवू नका... सभागृहात आमचे बहुमत
-विधान परिषद: तटकरे यांचा सत्तापक्षाला इशारा
मुंबई : विधान परिषदेत आमचे बहुमत आहे. आमच्या सहकार्यानेच तुम्हाला सभागृहाचे कामकाज चालवायचे आहे. त्यामुळे आवाज चढवू नका, विनंतीच्या भाषेत बोला. खडसे साहेब आपण सभागृहाचे नेते आहात त्यामुळे डोक्यावर बर्फ ठेवा. विरोधकांच्या भाषेत बोलू नका, अशा तिखट शब्दातच राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांनी सत्ताधारी बाकावरील सदस्यांना खडसावत संख्याबळाची आठवण करुन दिली.
शेतक-यांच्या कर्जमाफीवरुन आज सलग दुस-या दिवशी सभागृहात विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ केला. या गदारोळातच सरकारनेे कागदपत्रे सभागृहासमोर ठेवली. शिवाय, २०१५-१६ च्या पुरवणी मागण्या सादर करत अध्यादेशही पटलावर ठेवला. सभागृहाचे कामकाज रेटून नेतानाच सत्ताधारी बाकावरुन शेरेबाजी झाल्याने संतप्त झालेल्या तटकरे यांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि सहकार मंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर थेट हल्ला चढविला. तर, सरकारला कामकाज रेटून नेता येणार नसल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. गदारोळात कामकाज उरकून शेतक-यांवर अन्याय करु नका. गेले दोन दिवस कर्जमाफीची मागणी करतोय. पण, सरकारला कामकाज रेटूनच न्यायचे असेल तर पुरवणी मागण्यांसह प्रत्येक विषयावर आाम्ही मतविभाजन मागू, अस इशाराच मुंडे यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)
------------------------------

Web Title: Convention -1 (Tatkare)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.