शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पराजयानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; प्रियांका गांधी आघाडी सांभाळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 02:53 IST

विशेष म्हणजे ही बंडखोरी व कलह शांत करण्यासाठी अद्याप पक्षश्रेष्ठींपैकी कोणी पुढाकार घेतलेला नाही.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत फारच मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट त्यांना पदावरून दूर करण्याच्या मोहिमेत आहेत. गेहलोत यांना आता कोणत्याही समुदायाचा पाया नसल्यामुळे त्यांच्या जागी पायलट यांची नियुक्ती करावी, अशी पायलट समर्थकांची मागणी आहे.पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याविरुद्ध आघाडी उभारून बंडच केले आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसचे १५ आमदार तेलंगण राष्ट्र समितीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत आहेत, तर अंतर्गत कलहामुळे कर्नाटकातील कुमारस्वामी यांचे आघाडीचे सरकार संकटात आले आहे. विशेष म्हणजे ही बंडखोरी व कलह शांत करण्यासाठी अद्याप पक्षश्रेष्ठींपैकी कोणी पुढाकार घेतलेला नाही. त्याचे कारण म्हणजे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याची तयारी दाखविल्यानंतर ते पक्षाच्या अंतर्गत प्रश्नांत सक्रिय नाहीत.

प्रियांका गांधी आघाडी सांभाळणार?पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी आघाडी सांभाळण्याच्या तयारीत आहेत. त्या लवकरच कार्यकर्ते व नेत्यांशी चर्चा करतील. त्यांची नजर आता २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आहे. त्यासाठी त्या गट पातळीवर पक्ष बळकट करू पाहत आहेत, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस