शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंद यांच्या गुरूच्या नावावरून वाद, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:15 IST

पंतप्रधानांनी बंगाली महापुरुषांसंदर्भात सांस्कृतिक असंवेदनशीलता दर्शवल्याचा आरोप टीएमसीने केला आहे...

स्वामी विवेकानंद यांचे गुरू स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या नावावरून आता एक नवा वाद सुरू झाला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट केली. यात मोदी यांनी त्यांना 'स्वामी' म्हणून संबोधले आहे. यावरून आता तृणमूल काँग्रेसने (TMC) त्यांना लक्ष्य केले आहे. पंतप्रधानांनी बंगाली महापुरुषांसंदर्भात सांस्कृतिक असंवेदनशीलता दर्शवल्याचा आरोप टीएमसीने केला आहे.

यासंदर्भात भाष्य करताना टीएमसीने म्हटले आहे की, बंगालमध्ये रामकृष्ण परमहंस यांना 'स्वामी' नव्हे तर 'ठाकूर' म्हणून संबोधले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी यांच्या पोस्टवर प्रत्युत्तर देत म्हणाल्या, "पुन्हा एकदा, आपल्या पंतप्रधानांनी बंगालच्या महान व्यक्तींबद्दल त्यांची सांस्कृतिक असंवेदनशीलता उघडपणे दर्शवली आहे. आज युगावतार (आपल्या काळातील देव अवतार) श्री श्री रामकृष्ण परमहंसदेव यांची जयंती आहे. या प्रसंगी महान संताचा सन्मान करण्याचा प्रयत्न करताना, आपल्या पंतप्रधानांनी महान संताच्या नावापुढे 'स्वामी' हा अभूतपूर्व आणि अयोग्य उपसर्ग जोडला आहे."

सांस्कृतिक अस्मितेचे राजकारणयापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा उल्लेख 'बंकिम दा' केल्यावरून वाद झाला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपला 'बाहेरील पक्ष' ठरवण्यासाठी टीएमसी सातत्याने सांस्कृतिक अपमानाचे आरोप करत आहे.

भाजपचं प्रत्युत्तर -भाजप आमदार अग्निमित्रा पॉल यांनी तृणमूलच्या या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. "रामकृष्ण यांना स्वामी म्हणणे हा अपमान कसा असू शकतो का?" असा सवाल त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतःच सरस्वती मंत्रांचा चूक उच्चार करतात. ही चूक आहे की जाणूनबुजून? असा सवालही त्यांनी केला. "एकीकडे जगातील दिग्गज AI परिषदेसाठी दिल्लीत येत आहेत आणि बंगालमध्ये तुम्ही केवळ नकारात्मकता पसरवण्यात आहात," अशी टीकाही पॉल यांनी यावेळी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Swami Vivekananda Guru's name sparks row; Mamata targets PM Modi.

Web Summary : Mamata Banerjee criticizes PM Modi for allegedly disrespecting Bengali culture by referring to Ramakrishna Paramhansa as 'Swami' instead of 'Thakur'. BJP defends Modi, accusing Banerjee of spreading negativity.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा