शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक निवडणुकीत आता 'टीपू' चित्रपटावरून वाद, चित्रपट निर्मात्याचा सत्य समोर आणण्याचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 16:00 IST

"मला वाटते की, अत्याचारी टिपू सुल्तान काय होता हे लोकांना माहीत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे हा चित्रपट 70mm वर प्रदर्शित करण्याची माझी इच्छा आहे."

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता टीपू (Tipu) चित्रपटावरून नवा वाद सुरू झाला आहे. खरे तर, तोंडाला काळे फासलेले 'टीपू' चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात म्हैसूरच्या राजाचे सत्य समोर आणण्याचा दावा करण्यात येत आहे. हा चित्रपट संदीप सिंह (Sandeep Singh) आणि रश्मी शर्मा यांचा आहे. यासंदर्भात बोलताना चित्रपट निर्माता संदीप सिंह म्हणाले, आपण म्हैसूरच्या राजाचे सत्य समोर आणणार आहोत. जेव्हा मी टिपू सुल्तानचे सत्य समजून घेतल्यानंतर, थक्क झालो होतो. टिपूच्या स्टोरीने माझ्या अंगावर शहारे आले होते. मला वाटते की, अत्याचारी टिपू सुल्तान काय होता हे लोकांना माहीत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे हा चित्रपट 70mm वर प्रदर्शित करण्याची माझी इच्छा आहे.

'टिपू' चित्रपट तयार करण्याचा उद्देश? - चित्रपट निर्माता संदीप सिंह म्हणाले, खरे तर, टिपू हा सुल्तान म्हणवण्याच्याही लायकीचा नाही. विश्वास ठेवण्यासाठी माझे ब्रेनवॉश करण्यात आले होते. जसे की, आपल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात सांगण्यात आले आहे की, तो एक पराक्रमी व्यक्ती होता. पण त्याची क्रूर बाजू कुणालाही माहीत नाही. मी भविष्यातील पिढ्यांसाठी त्याची अधःकारातील ही बाजू समोर आणू इच्छित आहे.

कर्नाटकच्या निवडणुकीत हनुमान चालिसा - तर दुसरीकडे कर्नाटक निवडणुकीत बजरंगबलीचा आवाज तीव्र होताना दिसत आहे. आज भाजप सायंकाळी 7 वाजता संपूर्ण राज्यात हनुमान चालिसेचे पठण करणार आहे. कर्नाटकात बजरंग दल रस्त्यावर उतरला आहे. प्रत्येक शहरात हनुमान चालिसाचे पठण करण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे राज्यातील राजकारण अधिक तापले आहे.

बजरंग दलाने अनेक भागांत रस्त्यावर उतरून हनुमान चालिसा पठण केले आहे. एवढेच नाही, तर आज सायंकाळी 7 वाजताही हनुमान चालिसेचे आयोजन करण्यात आले आहे.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस