शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सुंदरतेमुळे चर्चेत आलेल्या हर्षा रिछारियामुळे वाद, 'या' एका कृत्यावरून संत मंडळी भडकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:36 IST

हर्षा निरंजनी आखाड्याच्या रथावर बसल्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. याचा फोटोही व्हायरल झाला आहे. तिच्या या कृत्यावरून संतांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रयागराजमध्ये होत असलेल्या महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर  साधू-संत सहभागी झाले आहेत. यात अनेक जण आपल्या नोकऱ्या आणि सामान्य जीवन सोडून सन्यास घेत आहेत अथवा घेण्याचा विचार करत आहेत. यांपैकी एक नाव म्हणजे, हर्षा रिछारिया. हर्षा आधी मॉडेल आणि अँकर होती, ती आता साध्वीच्या रुपात महाकुंभमेळ्यात सहभागी झाली आहे. मात्र, आता यावरून वाद निर्माण झाला आहे. हर्षा निरंजनी आखाड्याच्या रथावर बसल्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. याचा फोटोही व्हायरल झाला आहे. तिच्या या कृत्यावरून संतांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शाकंभरी मठाचे पीठाधीश्वर स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी व्यक्त केली नाराजी -निरंजनी अखाडा 4 जानेवारीला महाकुंभमध्ये सहभागी झाला. यावेळी हर्षा रिछारिया संतांसोबत रथावर बसलेली होती. तिच्या या कृत्यावर आता बेंगळुरूमधील शाकंभरी मठाचे पीठाधीश्वर स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना, "यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. धर्माला प्रदर्शनाचा भाग बनवणे धोकादायक ठरू शकते. संत आणि ऋषींनी हे टाळावे, अन्यथा त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही व्यक्त केली नाराजी -शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही एक मॉडेलला रथावर बसवण्याला विरोध केला आहे. ते म्हणाले, "महाकुंभात अशी परंपरा सुरू करणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे विकृत मानसिकता दर्शवते. कुंभमेळ्यात रंगरुप, चेहऱ्याचे सौंदर्य नव्हे तर मनाचे, हृदयाचे सौंदर्य दिसायला हवे. जी व्यक्तीला अद्याप संन्यास घ्यायचा की विवाह करायचा, याचा निर्णय घेऊ शकत नाही, अशा व्यक्तीला संत आणि ऋषींच्या शाहीरथावर स्थान देणे योग्य नाही. ती भक्त म्हणून सहभागी झाली असती तर एकवेळ चालले असते. मात्र, तिचे शाही रथावर बसणे पूर्णपणे चुकीचे आहे."

तत्पूर्वी, हर्षाने आपण साध्वी नसल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण सुमारे अडीच वर्षांपूर्वी गुरूंकडून दीक्षा घेतली आहे. मात्र, अद्याप संन्यास घेण्यासंदर्भात अथवा लग्न करण्यासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही, असेही तिने म्हटले आहे. तिने येथे अमृत स्नानही केले.  

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश