शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरामध्ये ३ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याने वाद, भारत सरकारनं दिलं असं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 20:40 IST

Tripura News: त्रिपुरामध्ये तीन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याने मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच बांगलादेशने याबाबत तीव्र आक्षेप घेतल्यानंतर भारत सरकारनेही तितकंच तिखट प्रत्युत्तर दिलं आहे. या तिन्ही बांगलादेशी नागरिकांनी त्रिपुरामधील एका ग्रामस्थाची हत्या केल्याचा आरोप होता.

त्रिपुरामध्ये तीन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याने मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच बांगलादेशने याबाबत तीव्र आक्षेप घेतल्यानंतर भारत सरकारनेही तितकंच तिखट प्रत्युत्तर दिलं आहे. या तिन्ही बांगलादेशी नागरिकांनी त्रिपुरामधील एका ग्रामस्थाची हत्या केल्याचा आरोप होता. तसेच मृत्युमुखी पडलेले तीन बांगलादेशी हे गुरे चोरणार तस्कर असल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे.  

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की,  आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ही घटना १५ ऑक्टोबर रोजी घडली. यात तीन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला. या तिन्ही बांगलादेशी नागरिकांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गुरे चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी स्थानिकांवर लोखंडी सळ्या आणि चाकूने हल्ला केला, यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक  ग्रामस्थांनी या बांगलादेशी नागरिकांच्या हल्ल्याचा प्रतिकार केला.

दरम्यान, बांगलादेशने मृत बांगलादेशी नागरिकांसाठी न्यायाची मागणी करत निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची मागणी केली आहे. बेकायदेशीररीत्या भारताच्या हद्दीत घुसल्यानंतर मृत्यू झालेल्या तीन बांगलादेशी नागरिकांच्या मृत्यूबाबत बांगलादेशकडून तीव्र आक्षेप घेण्यात  आला आहे. तसेच बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना म्हणजे मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचाही दावा केला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Controversy erupts after 3 Bangladeshi deaths in Tripura; India responds.

Web Summary : Three Bangladeshi nationals died in Tripura, sparking controversy. India claims they were cattle smugglers who attacked villagers, resulting in one death and retaliatory action. Bangladesh demands a fair investigation, alleging human rights violations.
टॅग्स :IndiaभारतTripuraत्रिपुराBangladeshबांगलादेश