शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पैगंबर प्रकरणी वाद चिघळला, अल कायदाची भारताला धमकी; दिल्ली, मुंबई, यूपीत हल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 23:08 IST

पैगंबर मोहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू असं अल कायदा संघटनेने म्हटलं आहे.

नवी दिल्ली - अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे. गुजरात, यूपी, मुंबई आणि दिल्ली येथे आत्मघाती हल्ले करण्यास तयार असल्याची अधिकृत धमकी त्याने दिली. त्याचबरोबर भाजपा लवकरच संपुष्टात येईल असेही ते म्हणाले. भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांनी टीव्ही डिबेट चर्चेदरम्यान दिलेल्या वक्तव्याबाबत अल कायदाने ही धमकी दिली आहे. या वादाचाही त्यांनी आपल्या संदेशात उल्लेख केला आहे.

अल-कायदाने सांगितले की, काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या प्रचारकाने टीव्हीच्या चर्चेदरम्यान इस्लाम आणि पैंगंबर मोहम्मद यांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ. आम्ही इतरांना या लढ्यात सहभागी होण्यास सांगू. पैगंबर मोहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू. आम्ही आमच्या शरीराला आणि आमच्या मुलांच्या शरीराला स्फोटके बांधू जेणेकरून अशा लोकांना उडवता येईल असं त्यांनी म्हटलं. 

तसेच पैगंबर मुहम्मद यांच्यावर गुन्हेगारांना आम्ही माफ करणार नाही. दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमधील भगव्या कार्यकर्त्यांना संपवणार. ते ना त्यांच्या घरात लपू शकतील किंवा सुरक्षा दलही त्यांना वाचवू शकणार नाही. पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा जोर धरत आहे. या प्रकरणात नुपूर शर्माला धमक्या मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्माला सुरक्षा पुरवली आहे. तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार नुपूर शर्माने दिल्ली पोलिसांकडे केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आता दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि तिच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

१२ मुस्लिम देशांनी आक्षेप घेतला आखाती देशातील अनेक इस्लामिक देशांनी भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपा प्रवक्त्यांच्या विधानावर आतापर्यंत १२ देशांनी आक्षेप घेतला आहे. ज्यामध्ये कतार, UAE, इराण, कुवैती, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, इंडोनेशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मालदीव यांचा समावेश आहे. भाजपाकडून दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. नुपूर शर्माला पक्षाने निलंबित केले आहे.

टॅग्स :BJPभाजपा