अलिगड मुस्लिम विद्यापीठातील भाजपाच्या कार्यक्रमामुळे वादंग
By Admin | Updated: November 28, 2014 23:54 IST2014-11-28T23:54:01+5:302014-11-28T23:54:01+5:30
भाजपाने 1 डिसेंबर रोजी स्वातंत्र्यसेनानी राजा महेंद्र प्रताप यांचा जयंती कार्यक्रम अलिगड मुस्लिम विद्यापीठात आयोजित केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
अलिगड मुस्लिम विद्यापीठातील भाजपाच्या कार्यक्रमामुळे वादंग
नवी दिल्ली/ अलिगड : भाजपाने 1 डिसेंबर रोजी स्वातंत्र्यसेनानी राजा महेंद्र प्रताप यांचा जयंती कार्यक्रम अलिगड मुस्लिम विद्यापीठात आयोजित केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या वादात राजकीय पक्षांनी उडी घेतली असतानाच या विद्यापीठातील शेकडो विद्याथ्र्यानी मोर्चा काढत भाजपाच्या प्रस्तावित कार्यक्रमाला विरोध केल्याने वातावरण तापले आहे. भाजपाचे नेते समाजाचे ध्रुवीकरण करीत असून, राजा महेंद्र प्रताप यांच्या नावाचा गैरवापर करीत या विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर आक्रमण करीत असल्याचा आरोप विद्यापीठातील शिक्षक संघटनेने (एएमयुटीए) केला आहे.
बसपा, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांनी या कार्यक्रमाला विरोध करीत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भाजपेतर पक्षांनी सोमवारी या विद्यापीठाच्या परिसरात निदर्शनांद्वारे निषेध नोंदविण्याचे ठरविले आहे. कुलगुरू लेफ्ट.जन. झमीर उद्दीन शाह यांनी विद्यापीठात ध्रुवीकरण होण्याची भीती व्यक्त करतानाच अशांतता निर्माण होण्याचा इशारा मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांना पाठविलेल्या पत्रत दिला आहे. राजकीय यंत्रणोवर नियंत्रण न राहिल्यास जातीय संघर्ष उद्भवण्याची शक्यताही शाह यांनी वर्तवली. कोणतेही पत्र नाही- स्मृती इराणी
या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाकडून कार्यक्रमाला विरोध करणारे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचा खुलासा स्मृती इराणी यांनी केला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)