तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष

By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:44+5:302015-02-21T00:49:44+5:30

Control room at Taluka level | तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष

तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष

>जिल्हा परिषद : स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी पथक
नागपूर : जिल्ह्यात स्वाईन फ्लू रुग्णाची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. तसेच पथक गठित करून विभागातील अधिकारी व क र्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती शुक्रवारी आरोग्य समितीच्या बैठकीत देण्यात आली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मासिक सभेत आजाराची लक्षणे व उपाययोजनाबाबत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. संशयित रुग्णांची संख्या असलेल्या गावात सर्वेक्षण करण्यात आले. शाळांत स्वाईन फ्लू संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे नियमित आढावा घेतला जातो, अशी माहिती उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी दिली.
तपासणीत हिवतापाचे १३ तर हत्तीरोगाचे ३३ रुग्ण आढळून आले. कुष्ठरोग नियंत्रणासाठी जनजागृतीची मोहीम राबविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला सदस्य जयकु मार वर्मा, सरीता रंगारी, बबीता साठवणे, शुभांगी गायधने,डॉ. शिवाजी सोनसरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
चौकट...
१२४ पाणी नमुने दूषित
जानेवारी महिन्यात जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या २२२३ पाणी नमुन्यापैकी १२४ दूषित आढळून आले आहेत. दूषित पाण्यावर नियंत्रण घालण्यासाठी विभागामार्फत जिल्ह्यात तपासणी मोहीम राबविली जात आहे.

Web Title: Control room at Taluka level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.