महसूल अधिकार्‍यांविरोधात ठेकेदारांचे काम बंद

By admin | Published: July 9, 2015 09:53 PM2015-07-09T21:53:15+5:302015-07-10T00:32:59+5:30

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थानिमित्त शहरात सुरू असलेली कामे पुन:श्च ठप्प झाली असून, सुरळीत सुरू असलेली कामे एकाएकी थांबविण्यात आली आहेत. महसूल वसूल करण्यासाठी मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा सिंहस्थानिमित्त काम करणार्‍या ठेकेदारांना अडसर होत असल्याने ठेकेदारांनी काम बंद केले आहे. सध्या त्र्यंबकेश्वर येथील सर्वच कामे अंतिम टप्प्यात असून, सर्व कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी ठेकेदार प्रयत्न करीत आहेत. प्रांताधिकार्‍यांनी काम पूर्ण करण्यासाठी ११ जुलै ही अंतिम तारखी दिली आहे. म्हणजे सिंहस्थ पर्वकालाच्या अगोदर (१४ जुलै) रोजी कामे पूर्ण करायची आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरू होती. एकीकडे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी कामे पूर्ण करावयास सांगतात तर साइटवरून दुसर्‍या साइटवर वाळू वाहतूक करताना तलाठी, सर्कल किंवा नायब तहसीलदार

The contractor's work against the revenue officials is closed | महसूल अधिकार्‍यांविरोधात ठेकेदारांचे काम बंद

महसूल अधिकार्‍यांविरोधात ठेकेदारांचे काम बंद

Next

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थानिमित्त शहरात सुरू असलेली कामे पुन:श्च ठप्प झाली असून, सुरळीत सुरू असलेली कामे एकाएकी थांबविण्यात आली आहेत. महसूल वसूल करण्यासाठी मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा सिंहस्थानिमित्त काम करणार्‍या ठेकेदारांना अडसर होत असल्याने ठेकेदारांनी काम बंद केले आहे. सध्या त्र्यंबकेश्वर येथील सर्वच कामे अंतिम टप्प्यात असून, सर्व कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी ठेकेदार प्रयत्न करीत आहेत. प्रांताधिकार्‍यांनी काम पूर्ण करण्यासाठी ११ जुलै ही अंतिम तारखी दिली आहे. म्हणजे सिंहस्थ पर्वकालाच्या अगोदर (१४ जुलै) रोजी कामे पूर्ण करायची आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरू होती. एकीकडे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी कामे पूर्ण करावयास सांगतात तर साइटवरून दुसर्‍या साइटवर वाळू वाहतूक करताना तलाठी, सर्कल किंवा नायब तहसीलदार वाळूचे ट्रॅक्टर या वाहनांना ३५०० - ७० हजारपर्यंत दंडाची रक्कम सांगतात. नाइलाजाने ठेकेदारांनी कामे बंद केली आहेत. परिणामी ११ जुलैपर्यंत कामे पूर्ण होणे अशक्य आहे. ठेकेदार म्हणतात, आम्ही गावात वाळू आणतच नाहीत. गल्लीबोळातील कामे करण्यासाठी साठा करू शकत नाही. यासाठी अन्यत्र ठिकाणाहून (गावातल्या गावात) साइटवर वाळू ट्रॅक्टरद्वारे नेत असतो. मात्र महसूलवाल्यांनी ट्रॅक्टर जप्तीची मोहीम हाती घेतल्याने कामे बंद केल्याशिवाय आमच्या पुढे पर्याय नाही. त्यात वाळू वाहतूकदारांनी अचानक संप पुकारून ठेकेदारांची कोंडी केली आहे. ठेकेदारांकडे वाळू येण्यास मार्गच उरला नाही.
येत्या काही दिवसाात साधुग्राममधील जागेतील जागा मागणार्‍या इच्छुकांना गाळे वाटप होणार आहे.या धामधुमीत ठेकेदारांना प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहे. ११ जुलै रोजी स‘ाद्री वाहिनीतर्फे त्र्यंबक शहराचे चित्रीकरण करण्यात येणार असून, १३ जुलै रोजी प्रसारण होणार आहे. तत्पूर्वी कामे पूर्ण होणे, साफसफाई स्वच्छता होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
साधुग्राममधील गाळ्यांचे वितरण लवकरच
त्र्यंबकेश्वर येथील साधुग्राममधील गाळ्यांचे वितरण लवकरच होणार आहे. साधू-महंत, महामंडलेश्वर ठिकठिकाणचे आश्रम सेवाभावी संस्थांचे ग्रुपकडून गाळे मागण्यांचे अर्ज आलेले आहेत. एकूण १३ एकर जागेतील ५८ गाळ्यांचे वाटप होणार असून गाळे वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध होणार आहेत. काही गाळे ३०० चौ.मीटर तर काही गाळे २४० चौ.मीटर आहेत. मागील वेळेस साधुग्राममध्ये अनेक गाळे रिकामे होते. तर फक्त १५ गाळे गेले होते. याच पार्श्वभूमीवर यावेळेस गाळे असतील.

Web Title: The contractor's work against the revenue officials is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.