कंत्राटदारांचे आयुक्तांना साकडे

By Admin | Updated: July 3, 2015 23:15 IST2015-07-03T23:15:52+5:302015-07-03T23:15:52+5:30

फोटो ओळी...महापालिकेतील कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करताना.

Contractors appointed commissioners | कंत्राटदारांचे आयुक्तांना साकडे

कंत्राटदारांचे आयुक्तांना साकडे

टो ओळी...महापालिकेतील कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करताना.
नागपूर : कंत्राटारांची थकीत बिले आणखी तीन महिने मिळण्याची शक्यता नाही. यामुळे महापालिकेतील कं त्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष विजय नायडू यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शुक्रवारी आयुक्त श्र्रावण हर्डीकर यांना बिलासाठी साकडे घातले.
प्रलंबित कामासोबच डांबरीकरणाच्या मुद्यावर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. परंतु यात तोडगा निघाला नाही. वास्तविक पावसाळ्याच्या दिवसात डांबरीकरणाची कामे बंद असतात. त्यामुळे या कामाची बिले न देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
दरम्यान गडर लाईन, नाल्याची भिंंत व इतर कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी नायडू यांच्या नेतृत्वात शुक्र्रवारी हर्डीकर यांनी भेट घेतली. रमजान महिना असल्याने कंत्राटदारांना थकीत बिल देण्याची मागणी केली. आधीच जुन्या कामाची बिले मिळालेली नाही.त्यातच साहित्याची रक्कम कंत्राटदारांना मिळालेली नाही. अशा परिस्थितीत काम करणे शक्य नसल्याचे हर्डीकर यांच्या निदर्शनास आणले. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शिष्टमंडळात युवराज मानकर, परवेज भाई, उमेश ओझा, मतीन अहमद, रफीक अहमद, महेश शेंडे, राजकुमार बजाज, राजा अग्रवाल आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)

Web Title: Contractors appointed commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.