कंटेनरमधील 16 लाखांचा मुद्देमाल चोरला
By admin | Updated: September 16, 2015 23:38 IST
मंगळवेढा: ढाब्यावर उभा असलेल्या मालवाहू कंटेनरमधील अज्ञात चोरट्याने 16 लाख 22 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी घडली.
कंटेनरमधील 16 लाखांचा मुद्देमाल चोरला
मंगळवेढा: ढाब्यावर उभा असलेल्या मालवाहू कंटेनरमधील अज्ञात चोरट्याने 16 लाख 22 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी घडली.नेस्ले इंडिया कंपनीचे कंटेनर (क्र. एम. एच. 9 सी. ए. 1610 हा माल भरून खाली करण्यासाठी आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे निघाला होता. दरम्यान, विर्शांतीसाठी कचरेवाडी येथील ढाब्यावर थांबला होता. सायंकाळी सातच्या सुमारास चालक धनाजी तुळशीराम चोरमुले (वय 45) हा आपल्या कचरेवाडी येथे मुक्कामी गेला. जाताना ढाब्याचे मालक अर्जुन हेंबाडे यांना कंटेनरकडे लक्ष देण्यास सांगितले होते. मंगळवारी सकाळी चालक माघारी आल्यानंतर कंटेनरचा पाठीमागील दरवाजा उघडा होता. त्यामध्ये पाहिले असता, विविध प्रकारचे चॉकलेटचे 16 लाख 22 हजार 200 रु. किमतीचा माल चोरल्याचे आढळून आले. चालक चोरमुले यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)