अहमदाबाद ते नेवार्क व्हाया लंडन सेवा सुरू

By Admin | Updated: August 16, 2016 01:42 IST2016-08-16T01:42:50+5:302016-08-16T01:42:50+5:30

प्रवासी वाहतूक करणाऱ्या एअर इंडियाने अहमदाबाद आणि नेवार्क (न्यू जर्सी) या दोन ठिकाणांना लंडनमार्गे जोडणाऱ्या विमानसेवेचा आरंभ सोमवारपासून केला.

Continuing with the London service to Ahmedabad via Newark | अहमदाबाद ते नेवार्क व्हाया लंडन सेवा सुरू

अहमदाबाद ते नेवार्क व्हाया लंडन सेवा सुरू

मुंबई : प्रवासी वाहतूक करणाऱ्या एअर इंडियाने अहमदाबाद आणि नेवार्क (न्यू जर्सी) या दोन ठिकाणांना लंडनमार्गे जोडणाऱ्या विमानसेवेचा आरंभ सोमवारपासून केला.
७०व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एअर इंडियाने या सेवेला प्रारंभ केला.
‘एआय १७१’ हे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातील तीन दिवस सकाळी ५.३० वाजता सुटेल आणि १०.१५ वाजता लंडनला पोहोचेल.
नेवार्कच्या प्रवासासाठी लंडनहून हे विमान १२.३० वाजता सुटेल आणि १५.०० वाजता नेवार्कला पोहोचेल. परतीचे विमान ‘एआय-१७२’ नेवार्कहून २२.३०ला सुटेल आणि १०.१५ (+१) वाजता लंडनला पोहोचेल.
लंडनहून हे विमान १२.३० वाजता सुटून अहमदाबादला ते 0२.00 (+२) वाजता पोहोचेल. यासाठी बी-७८७ ड्रीमलायनर एअरक्राफ्ट वापरण्यात येणार आहे. १० सप्टेंबर २०१६पर्यंत या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खास सवलत असणारे विमान भाडे जाहीर करण्यात आले आहे. या विमानसेवेमुळे अहमदाबादमधील तब्बल सहा लाख लोकांची सोय होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Continuing with the London service to Ahmedabad via Newark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.