शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाचा अवमान; ३ वकिलांना तुरुंगवास; न्यायाधीशांवर बेछूट आरोप करणे भोवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 23:56 IST

प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड सुनावला

नवी दिल्ली : राष्ट्रपती आणि सरन्यायाधीशांकडे केलेल्या तक्रारीत न्या. रोहिंग्टन नरिमन आणि न्या. विनीत शरण या दोन न्यायाधीशांविरुद्ध बेछूट आणि निंदनीय आरोप करून न्यायालयाचा अवमान (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) केल्याबद्दल विजय कुर्ले, निलेश ओझा आाणि रशीद खान पठाण या मुंबईतील तीन वकिलांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्रत्येकी तीन महिन्यांची साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

बॉम्बे बार असोसिएशन’ या वकिलांच्या व ‘ बॉम्बे इन्कॉर्पोरेटेड लॉ सोसायटी’ या सॉलिसिटर फर्मच्या संघटनांनी पाठविलेल्या पत्रावरून सर्वोच्च न्यायालयाने या तिघांविरुद्ध गेल्या वर्षी स्वत:हून ‘कन्टेम्प्ट’ची कारवाई सुरू केली होती. त्यात २७ एप्रिल रोजी तिघांनाही दोषी ठरवून शिक्षेसाठी बुधवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र, तिघांनीही शिक्षेविषयी युक्तिवाद करण्याऐवजी २७ एप्रिलचा निकाल मागे घेण्यासाठी, एका न्यायाधीशाने सुनावणीतून माघार घेण्यासाठी व एकूणच सुनावणी तहकूब करण्यासाठी अर्ज केले. न्या. दीपक गुप्ता व न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने आरोपींचे वरील सर्व अर्ज फेटाळले व त्यांना जराही पश्चात्ताप झाल्याचे दिसत नाही, असे नमूद करीत वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. मात्र, सध्या ‘लॉकडाऊन’ सुरू असल्यामुळे आरोपींनी ही शिक्षा १६ आठवड्यांनंतर भोगावी, असा आदेश दिला गेला. शिक्षा भोगण्यासाठी त्यांनी न्यायालयाच्या महाव्यवस्थापकांपुढे स्वत:हून हजर व्हायचे आहे; अन्यथा त्यांच्याविरुद्ध अटक वॉरन्ट काढले जाईल. दंड न भरल्यास तिघांनाही १५ दिवस तुरुंगात राहावे लागेल.न्यायमूर्तींना ‘व्हिडिओ’ निरोप : हा निकाल दिल्यानंतर काही तासांतच न्या. दीपक गुप्ता सेवानिवृत्त झाले. ते फेब्रुवारी २०१७ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. न्यायालयापुढील प्रांगणाच्या हिरवळीवर निवृत्त होणाऱ्या न्यायमूर्तींसाठी वकील संघटनेतर्फे हृद्य निरोप समारंभ आयोजित केला जातो; परंतु सध्या कोरोनामुळे न्यायालयाचे काम जसे व्हिडिओ माध्यमाने सुरू आहे, तसा न्या. गुप्ता यांचा व्हिडिओ निरोप समारंभ झाला. सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले गेले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय