बँक व्यवस्थापकाला अवमानना नोटीस
By Admin | Updated: September 2, 2015 23:32 IST2015-09-02T23:32:03+5:302015-09-02T23:32:03+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक प्रकाशचंद्र बारोर यांना अवमानना नोटीस बजावून १४ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

बँक व्यवस्थापकाला अवमानना नोटीस
न गपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक प्रकाशचंद्र बारोर यांना अवमानना नोटीस बजावून १४ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.लक्ष्मण काळे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. त्यांनी बँकेत टेलर म्हणून कार्य केले आहे. एका प्रकरणात विभागीय चौकशीनंतर त्यांना निवृत्तीनंतरचे विविध लाभ नाकारण्यात आले होते. उपमहाव्यवस्थापकांनी काळे यांचे अपील ऐकल्यानंतर वादग्रस्त कारवाई रद्द करून शिक्षेत बदल केला व काळे यांना सेवामुक्त केले. यानंतर काळे यांनी ग्रॅच्युईटीसाठी सहायक कामगार आयुक्ताकडे अर्ज केला. आयुक्तांनी २ लाख ७७ हजार ७९५ रुपये १० टक्के वार्षिक व्याजासह काळे यांना देण्याचे आदेश दिले. याविरुद्ध बँकेने विभागीय कामगार आयुक्ताकडे अपील केले. १० डिसेंबर २००१ रोजी अपील खारीज करण्यात आले. परिणामी बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतली. ८ जानेवारी २०१४ रोजी उच्च न्यायालयाने बँकेची याचिका फेटाळली. यानंतरही बँकेने काळे यांना ग्रॅच्युईटीची पूर्ण रक्कम दिलेली नाही. यामुळे काळे यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. काळेंतर्फे ॲड. व्ही. एस. धोबे यांनी बाजू मांडली.