शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेस्टॉरंटनं 40 पैसे अधिक घेतले, म्हणून कस्टमर पोहोचला कोर्टात; न्यायालयानं दिला असा निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 18:35 IST

1 रुपयांची भरपाई मागत मूर्ती म्हणाले, या घटनेमुळे आपल्याला धक्का बसला आहे आणि आपण अस्वस्थ झालो आहोत.

बेंगळुरूमध्ये एका रेस्टॉरंटने एका व्यक्तीकडून बिलात 40 पैसे अधिक घेतले. ही गोष्ट त्या कस्टमरला सहन न झाल्याने, तो थेट कंझ्यूमर कोर्टात (Consumer court) पोहोचला. मात्र, ग्राहकन्यायालयाने निकाल देत, संबंधित ग्राहकालाच 2000 रुपये रेस्टॉरंटला आणि 2000 रुपये न्यायालयाला दंड स्वरुपात भरण्याचा आदेश दिला. (Restaurant bill case)

बिल पाहून संतापले होते आजोबा -हे प्रकरण 2021 चे आहे. मूर्ती नावाच्या एका वृद्ध व्यक्तीने शहरातील हॉटेल एम्पायरमध्ये भोजन ऑर्डर केले होते. जेव्हा ते ऑर्डर घेण्यासाठी गेले, तेव्हा स्टाफने त्यांना 265 रुपयांचे बिल दिले. मात्र, त्यांचे एकूण बिल 264.60 रुपये एढे होते. मूर्ती यांनी यासंदर्भात स्टाफकडे विचारणा केली. मात्र, त्यांना योग्य उत्तर न मिळाल्याने ते बेंगळुरू कंझ्यूमर कोर्टात पोहोचले आणि रेस्टॉरंटवर लोकांची लूट करत असल्याचा आरोप लावला. 

या खटल्यात आजोबांनी स्वतःच केला स्वतःचा बचाव -1 रुपयांची भरपाई मागत मूर्ती म्हणाले, या घटनेमुळे आपल्याला धक्का बसला आहे आणि आपण अस्वस्थ झालो आहोत. 26 जून 2021 रोजी, मूर्ती यांनी स्वत:च न्यायालयात आपली बाजू मांडली होती. तर रेस्टॉरंटच्या वतीने वकिल अंशुमन एम आणि आदित्य एम्ब्रोस यांनी युक्तिवाद केला. तक्रार खूपच लहान आणि त्रासदायक असल्याचे दोघांचे म्हणणे होते. वस्तू आणि सेवा कर कायदा-2017 च्या कलम 170 अंतर्गत, असे करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

50 पैशांपेक्षा अधिक झाल्यास एक रुपया असेल -8 महिन्यांपासून सुरू असलेल्या या खटल्यात न्यायाधीश म्हणाले, भारत सरकारच्या नियमांनुसार 50 पैशांपेक्षा कमी पैसे दुर्लक्षित केले जातात आणि अधिक झाल्यास एक रुपया घेता येतो. वेळ वाया घालवल्याबद्दल कोर्टाने मूर्ती यांना फटकारले. तसेच, 4 मार्च 2022 रोजी न्यायालयाने, 2000 रुपये रेस्टॉरंटला आणि 2000 रुपये न्यायालयाला दंड स्वरुपात भरण्याचे आदेश दिले आहेत. हा दंड मूर्ती यांना 30 दिवसांत भरायचा आहे.

टॅग्स :consumerग्राहकConsumer Goodsग्राहकोपयोगी वस्तूCourtन्यायालयBengaluruबेंगळूर