शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या भूभागावरच बांधकाम केलंय; अरुणाचल प्रदेशमधील 'त्या' प्रकरणावरून चीनने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 13:33 IST

अरुणाचल प्रदेशात चीननं गाव उभारल्याचं सॅटलाईट फोटोंमधून आलं होतं समोर

ठळक मुद्देअरुणाचल प्रदेशात चीननं गाव उभारल्याचं सॅटलाईट फोटोंमधून आलं होतं समोरआम्ही कधीही तथाकथिक अरुणाचल प्रदेशला मान्यता दिली नाही, चीनचं वक्तव्य

लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत असलेल्या सीमेवर चीनकडून सातत्याने कुरापती काढण्यात येत असतात. या भागात सीमारेषा निश्चित नसल्याने चिनी सैन्याकडून या भागात सातत्याने घुसखोरी होत असते. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधीलभारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी करून चक्क एक गाव वसवल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. सॅटेलाइट फोटोंमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा दावा करण्यात आला होता. परंतु आता या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना आपल्याच जमिनीवर बांधकाम केलं असल्याचं सांगत चीननं सुनावलं आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. असं असलं तरी अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा भाग असल्याचा दावा सातत्यानं चीनकडून करण्यात येत आहे."जंगनान क्षेत्रावरील (दक्षिण तिबेट) चीनची स्थिती स्पष्ट आणि स्थिर आहे. आम्ही कधीही तथाकथित अरुणाचल प्रदेशला मान्यता दिली नाही. आम्ही आमच्या भूभागावर चीनची विकासकामं करणं आणि बांधकाम करणं सामान्य आहे. हे आमचं क्षेत्र आहे त्यामुळे दोष देता येणार नाही," अशी प्रतिक्रिया चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी माध्यमांशी बोलताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. काही दिवसांपूर्वी माहिती आली होती समोरसॅटेलाइट फोटोत दिसत असलेल्या बांधकामानुसार चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या हद्दीत घुसखोरी करून एक नवा गाव वसवलं असल्याचं दिसत आहे. या गावामध्ये सुमारे १०१ घरं असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच हे सॅटेलाइट फोटो १ नोव्हेंबर २०२० रोजीचे असल्याचंही म्हटलं जात आहे. याबाबत तज्ज्ञांना विचारले असता त्यांनी जा छायाचित्रांना दुजोरा दिला. तसेच हे गाव भारताच्या प्रत्यक्ष सीमेपासून साडे चार किलोमीटर आत वसले असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही बाब भारताची चिंता वाढवणारी आहे.हे गाव अरुणाचल प्रदेशमधील अप्पर सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. या भागातील सीमेवरून दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. तसेच या भागाला सशस्त्र लढाईची जागा म्हणून चिन्हांकित करण्यात आलं आहे. हे गाव हिमालयाच्या पूर्व भागात अशावेळी वसवण्यात आलं आहे. काही काळापूर्वी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक चकमक झाली होती.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतDoklamडोकलामArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश