नीलपर्वतावर १०८ फूट उंच त्रिशूलाची उभारणी बुधवारी समर्पण सोहळा: सोलापूरच्या सद्गुरू सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम

By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:36+5:302015-09-03T23:05:36+5:30

सोलापूर: सद्गुरु सेवा प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने शिपलागिरी महाराजांची इच्छापूर्ती आणि स्मृतिप्रीत्यर्थ त्र्यंबकेश्वर, नीलपर्वत जुन्या आखाड्यासमोर १०८ फूट उंचीचा ३ हजार किलो वजनाचा भव्य त्रिशूल उभारण्यात आला आहे. त्याचा समर्पण सोहळा ९ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

Construction of 108 ft tall trident on Nilaprakashtha dedication ceremony on Wednesday: Sadhguru Seva Pratishthan's initiative of Solapur | नीलपर्वतावर १०८ फूट उंच त्रिशूलाची उभारणी बुधवारी समर्पण सोहळा: सोलापूरच्या सद्गुरू सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम

नीलपर्वतावर १०८ फूट उंच त्रिशूलाची उभारणी बुधवारी समर्पण सोहळा: सोलापूरच्या सद्गुरू सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम

लापूर: सद्गुरु सेवा प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने शिपलागिरी महाराजांची इच्छापूर्ती आणि स्मृतिप्रीत्यर्थ त्र्यंबकेश्वर, नीलपर्वत जुन्या आखाड्यासमोर १०८ फूट उंचीचा ३ हजार किलो वजनाचा भव्य त्रिशूल उभारण्यात आला आहे. त्याचा समर्पण सोहळा ९ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
या सोहळ्यास आखाडा प्रमुख श्री महंत हरिगिरीजी महाराज (आंतरराष्ट्रीय महामंत्री), श्री महंत श्री प्रेमगिरीजी महाराज (आंतरराष्ट्रीय मंत्री), श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. मोहोळ तालुक्यातील देगाव (वाळूज) येथे श्री गुरुदेव सिद्धाश्रम आहे. या ठिकाणी दर अमावस्येला होमहवन केला जातो. असंख्य भक्तगण दर्शनाचा लाभ घेतात. या ठिकाणी श्री शिपलागिरी महाराजांची समाधी आहे. श्री श्री श्री १००८ ब्रšालीन महंत श्री शिपलागिरी महाराज हे २५ मे २०१२ रोजी तीर्थयात्रा चालू असताना कुरुक्षेत्र येथे त्यांनी देह सोडला. शिपलागिरी महाराज हे पंचदशनाम, जुना आखाडा त्र्यंबकेश्वर येथे विविध पदांवर होते. १९९० च्या कुंभमेळ्याचे ते अध्यक्ष होते.
शिपलागिरी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्र्यंबकेश्वर, नीलपर्वत, जुन्या आखाड्यासमोर १०८ फूट उंचीचा भव्य त्रिशूल उभारला आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, महंत श्री हरिगिरीजी महाराज, साधू-संत व सद्गुरु सेवा प्रतिष्ठानचे सदस्य, महाराजांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य त्रिशूलाचा उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. ९ सप्टेंबर) होत आहे. या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन सद्गुरु सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Construction of 108 ft tall trident on Nilaprakashtha dedication ceremony on Wednesday: Sadhguru Seva Pratishthan's initiative of Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.