शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील त्या जागेवर गौतम बुद्धांचे मंदिर बांधा, भाजपा खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 22:29 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वीच अयोध्येत आपण राम मंदिराच्या उभारणीची तयारी करत असल्याचे म्हटले होते.

लखनौ - अयोध्येतील राम मंदिराच्या जागेवर भगवान गौतम बुद्ध यांचे मंदिर बांधा, अशी मागणी भाजपा खासदाराने केली आहे. उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यातील भाजपा खासदार सावित्री बाई फुले यांनी ही मागणी केल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या जागेतील उत्खननावेळी अनेक प्रतिमा मिळाल्या आहेत. तसेच अनेक तज्ञांच्या सर्वेक्षणातूनही या जागेचे बौद्ध धर्माशी जवळचे नाते असल्याचे समोर आल्याचे फुले यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वीच अयोध्येत आपण राम मंदिराच्या उभारणीची तयारी करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, भाजपच्याच खासदार असलेल्या सावित्रीबाई फुलेंनी असे विधान करून पुन्हा नवीन वादाला तोंड फोडले आहे. प्रयागराज येथे पत्रकारांशी संवाद साधताना, आम्ही अयोध्येतील वादग्रस्त जागेवर गौतम बुद्धांचे मंदिर बाधण्याची मागणी करत आहोत. कारण, बौद्ध हा एकमवे धर्म आहे, जो जाती आणि वर्गाच्या आधारावर कुणाशाची भेदभाव करत नाही, असे खासदार फुले यांनी म्हटले आहे. भाजपा व त्यांच्या सहकारी पक्षांचा दलित आणि आरक्षणाला विरोध असल्याचे फुले यांनी म्हटले. तसेच मी खात्रीशीरपणे जिंकणारी उमेदवार होते, म्हणूनच भाजपाने 2014 साली मला तिकीट दिलं. पण, मी केवळ माझ्या संघर्ष आणि समर्पणामुळे जिंकले आहे. आता, भाजापाकडून दलित आणि गरीबांच्या अधिकारांना कुचलण्याचे काम होत असून संविधान बदलण्याचा डाव असल्याचेही फुले यांनी म्हटले. 

टॅग्स :BJPभाजपाRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याyogi adityanathयोगी आदित्यनाथ