शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत मशीद बांधा, चक्क भाजपाच्याच नेत्याने केली मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 16:58 IST

'मंदिर वही बनाएंगे' असा नारा देत नव्वदच्या दशकात भारतीय जनता पक्षाने आपली पाळेमुळे संपूर्ण उत्तर भारतात विस्तारली होती.

लखनौ - 'मंदिर वही बनाएंगे' असा नारा देत नव्वदच्या दशकात भारतीय जनता पक्षाने आपली पाळेमुळे संपूर्ण उत्तर भारतात विस्तारली होती. मात्र केंद्रात आणि उत्तर प्रदेशात स्वबळावर सत्ता स्थापूनही भाजपाला अयोध्येत राम मंदिर बांधणे काही शक्य झालेले नाही. आतातर अयोध्येत मशीद बांधली पाहिजे, असे वक्तव्य करून भाजपाच्या एका नेत्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे. भाजपाचे विधान परिषद आमदार बुक्कल नवाब यांनी लखनौमधील अल्पसंख्याक मोर्चाच्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या कार्यक्रमातही जोरदार गोंधळ झाला. तसेच नवाब यांना तातडीने मंचावरून हटवण्यात आले. विशेष बाब म्हणजे बुक्कल नवाब यांनी जेव्हा हे वक्तव्य केले तेव्हा केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वीसुद्धा मंचावर उपस्थित होते. दरम्यान, वादाला तोंड फुटल्यानंतर बुक्कल नवाब यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना माझे बोलणे उपस्थितांना व्यवस्थित कळले नाही, असा दावा केला. मिळालेल्या माहितीनुसार बुक्कल नवाब यांनी अल्पसंख्याक मोर्चाच्या कार्यक्रमात बोलताना अचानक अयोध्येमधील वादग्रस्त जमिनीच्या मुद्द्याला हात घातला. त्यानंतर तेथे मशीद बांधण्याची मागणी त्यांनी केली. भाजपा आमदाराच्या विचित्र पावित्र्यामुळे सभेत गोंधळ माजला. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.  या गोंधळादरम्यान, बुक्कल नवाब यांना मंचावरून तातडीने हटवण्यात आले. मात्र त्यानंतरही बुक्कल नवाब यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू होती. 

टॅग्स :BJPभाजपाAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश