दिल्लीत कॉन्स्टेबलची गोळ्या घालून हत्या
By Admin | Updated: October 14, 2014 01:49 IST2014-10-14T01:49:32+5:302014-10-14T01:49:32+5:30
दिल्लीलगतच्या विजय विहार क्षेत्रत सोमवारी पहाटे काही लोकांनी दिल्ली पोलिसातील एका कॉन्स्टेबलची हत्या केली. या हल्ल्यात अन्य एक कॉन्स्टेबल जखमी झाला.

दिल्लीत कॉन्स्टेबलची गोळ्या घालून हत्या
नवी दिल्ली : दिल्लीलगतच्या विजय विहार क्षेत्रत सोमवारी पहाटे काही लोकांनी दिल्ली पोलिसातील एका कॉन्स्टेबलची हत्या केली. या हल्ल्यात अन्य एक कॉन्स्टेबल जखमी झाला.
हल्लेखोरांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात आल्याने पोलीस कर्मचा:यांनी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता हा हल्ला झाला. गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे.कॉन्स्टेबल जगबीर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर नरेंद्र गंभीर जखमी असून शहरातील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. पहाटे 2 वाजेच्या सुमारास दोघे पोलीस मोटारसायकलने रात्रीची गस्त घालत होते. एल ब्लॉकच्या 7 क्रमांकाच्या गल्लीत काही लोक ऑटोत बसले असल्याचे त्यांना दिसले. चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यासाठी कॉन्स्टेबल ऑटोत बसले आणि अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.