शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 10:21 IST

२६ एप्रिलला अधिकाऱ्यांनी हेड कॉन्स्टेबल इफ्तियार अली आणि त्यांच्या कुटुंबातील ८ जणांना डिपोर्ट करण्याची नोटीस पाठवली

जम्मू - जम्मू काश्मीर हायकोर्टाने एका पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि त्याच्या ८ भाऊ बहि‍णींना पाकिस्तानात पाठवण्यावर बंदी आणली आहे. हे सर्व जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत असं हायकोर्टाने मानले आहे. अधिकाऱ्यांना या सगळ्यांना पाकिस्तानी नागरिक असल्याचं सांगत डिपोर्ट करण्याची नोटीस दिली होती. आता हे कुटुंब पंजाबच्या अटारी बोर्डरवरून जम्मूच्या पुंछ जिल्ह्यात त्यांच्या घरी परतले आहे. हेड कॉन्स्टेबल आणि कुटुंबाने सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे हायकोर्टाने हा निर्णय दिला. कागदपत्रानुसार हे कुटुंब पुंछ जिल्ह्यातील रहिवासी आहे. 

कोर्ट काय म्हणालं?

न्यायाधीश राहुल भारती यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर आदेशात म्हटलं की, याचिकाकर्त्यांना केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर सोडण्यास सांगू नये, ना त्यांच्यावर दबाव आणावा. अली मागील २७ वर्षापासून पोलीस विभागात कार्यरत आहेत. सध्या ते वैष्णोदेवी मंदिराच्या कटरा चौकीत तैनात आहेत. महसूल विभागाच्या कागदपत्रानुसार ते जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणी न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना पुढील २ आठवड्यात एक विस्तृत रिपोर्ट सादर करण्यास सांगितले. या प्रकरणाची सुनावणी २० मे रोजी होणार आहे. 

प्रकरण काय?

२६ एप्रिलला अधिकाऱ्यांनी हेड कॉन्स्टेबल इफ्तियार अली आणि त्यांच्या कुटुंबातील ८ जणांना डिपोर्ट करण्याची नोटीस पाठवली. हे सर्व पाकिस्तानी नागरिक असल्याचा प्रशासनाचं म्हणणं होते. पोलिसांनी या सगळ्यांना पोलीस स्टेशनला बोलावले आणि तिथून अटारी पाठवले गेले. २२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू झाली. या कार्यवाहीत इफ्तियार अली जे मागील २६ वर्ष जम्मू काश्मीर पोलीस दलात आहेत. त्यांना पाकिस्तानी नागरिक असल्याचं सांगत नोटीस पाठवली. याविरोधात अली यांनी हायकोर्टात धाव घेतली. 

कुठे राहत होते अलीचे वडील?

डिपोर्टेशनविरोधात आंदोलन करणारे कार्यकर्ते सफीर चौधरी यांनी अलीचे वडील फकर दीन हे मूळचे सलवाह गावचे रहिवासी होते हे सांगितले. १९६५ च्या युद्धात या गावचा निम्मा भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. त्यामुळे दीन आणि त्यांची पत्नी फातिमा यांना पीओकेमध्ये शरण जावे लागले. तिथे एका रिफ्यूजी कॅम्पमध्ये ३ मुलांसह ते राहायचे. अलीसह आणखी ६ मुले तिथे जन्मले. १९८० च्या दशकात हे कुटुंब पुन्हा पुंछ जिल्ह्यात परतले. इथं आल्यानंतर जम्मू काश्मीर प्रशासनाने त्यांना काश्मीरचे रहिवासी असल्याचं मान्य केले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला