कारस्थान करुन जिवंत पत्नीला जाळले

By Admin | Updated: March 1, 2017 18:34 IST2017-03-01T18:25:25+5:302017-03-01T18:34:40+5:30

उत्तरप्रदेशमध्ये एका व्यक्तीने आपल्या 21 वर्षीय पत्नीला जिंवत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

By conspiring and burning a living wife | कारस्थान करुन जिवंत पत्नीला जाळले

कारस्थान करुन जिवंत पत्नीला जाळले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - उत्तरप्रदेशमध्ये  एका व्यक्तीने आपल्या 21 वर्षीय पत्नीला जिंवत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये  कुटुंबातील व्यक्तींचा समावेशही आहे. या घटनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. उत्तरप्रदेश पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार, 21 वर्षीय महिलेला तीच्या पतीने जिवंत जाळले. महिलेला नोयडा येथिल शारदा हॉस्पिटलने मृत घोषित केले होते. पण रुग्णालयातील दोन डॉक्टरांच्या समितीने दिलेल्या माहितीनुसार, त्या महिलेला सतत जिवंत जाळल्याच्या दिलेल्या धमकीमुळे तिचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाकडून दिलेल्या मृत्यूच्या दाखल्यानुसार महिलेचा मृत्यू रविवारी रात्री 11:45 वा. झाला आहे. त्यानंतर आठ तासांनी अलीगढमध्ये तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.

पोलिसांना कसा आला संशय -
पहिल्यांदा मृत्यू घोषित करणाऱ्या डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, फेफड्याला झालेल्या इन्फेक्शनमुळे महिलेचा मृत्यू झाला होता. तर या घटनेचा तपास करणाऱ्या दोन डॉक्टरांच्या रिपोर्टसनुसार, महिलेच्या श्वासनलिका आणि फेफड्यामध्ये जळालेले काही कण दिसून आले. त्या डॉक्टरांच्या मते असे कण ज्यावेळी एकाद्याला जिंवत जाळले जाते तेंव्हा दिसू शकतात. एकाद्या व्यक्तीला जिंवत जाळल्यास ती व्यक्ती मृत झाल्यानंतर हे कण शरीरात प्रवेश करु शकत नाहीत. या देन वेगळ्या रिपोर्टस मुळे पोलिसांनी प्रथम या घटनेवर संशय व्यक्त करत कारवाई कऱण्यास सुरुवात केली.

भावाला बहिणीच्या मृतवर पाहिल्यांदा संशय आला त्यानंतर त्याने अलिगढ पोलिस स्थानकात तक्रार केली. पोलिस ज्यावेळी घटनेच्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी मृतदेहाला अग्निच्या बाहेर काढले त्यावेळी ती महिला 70-80 टक्के भाजली होती. या घटनेनंतर महिलेच्या घरच्यांनी पोलिस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवला.

मृत महिलेच्या घरच्यांनी पतीसह अन्य दहा जणांवर अत्याचार करुऩ मारल्याचा आरोप केला आहे. सध्या सर्व आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मृत महिला बुलंदशहर येथिल रहिवासी असून गेल्या वर्षी नोएडा येथे तिचे लग्न झाले होते.

Web Title: By conspiring and burning a living wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.