शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 17:51 IST

"काँग्रेसने ६-७ दशकांत केलेल्या चुका आता आपले सरकार एक-एक करून सुधारत आहे..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (१९ डिसेंबर २०२५) आसाममधील गुवाहाटी येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला. "काँग्रेस सरकारच्या काळात आसाम आणि ईशान्य भारताचा विकास त्यांच्या अजेंड्यातच नव्हता, उलट आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचे कट कारस्थान रचले जात होते," असा खळबळजनक आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसच्या सरकारांमध्ये बसलेले लोक विचारायचे, आसाम आणि ईशान्येकडे जातंच कोण? आसाममध्ये आधुनिक विमानतळ, रेल्वे आणि हायवेची काय गरज आहे? असा विचार ते कायचे. याच संकुचित विचारामुळे काँग्रेसने अनेक दशके या संपूर्ण प्रदेशाची उपेक्षा केली. काँग्रेसने ६-७ दशकांत केलेल्या चुका आता आपले सरकार एक-एक करून सुधारत आहे."

मोदी पुढे म्हणाले, "माझ्यासाठी आसामचा विकास ही केवळ गरज नाही, तर एक जबाबदारी आणि उत्तरदायित्व आहे. गेल्या ११ वर्षांत ईशान्य भारतासाठी लाखो कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी झाल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारी नोकऱ्यांमधील भ्रष्टाचाराचा उल्लेख करताना ते म्हणाले, "काँग्रेसच्या काळात आसाममध्ये वशिल्याशिवाय (चिठ्ठी आणि खर्च) नोकरी मिळणे अशक्य होते, पण आज हजारो तरुणांना पारदर्शकपणे सरकारी नोकऱ्या मिळत आहेत."

हिंसाचाराकडून औद्योगिक विकासाकडे -"ज्या भागात एकेकाळी हिंसाचार आणि रक्तपात व्हायचा, तेथे आज ४जी आणि ५जी तंत्रज्ञान पोहोचले आहे. ज्या जिल्ह्यांची ओळख हिंसाग्रस्त जिल्हे असा होता, ते जिल्हे आज आकांक्षी जिल्हे म्हणून ओळखले जात आहेत. भविष्यात हेच जिल्ह्ये 'इंडस्ट्रियल कॉरिडॉर' बनतील. आज ईशान्य भारताबाबत संपूर्ण देशात एक नवा विश्वास निर्माण झाला आहे," असेही मोदी म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Modi Accuses Congress of Plotting to Make Assam Part of Pakistan

Web Summary : PM Modi accuses Congress of plotting to make Assam part of 'East Pakistan.' He highlighted the region's neglect under past Congress regimes, contrasting it with current development initiatives focused on infrastructure and job creation, transitioning from violence to industrial growth.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसAssamआसाम