शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
4
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
5
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
6
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
7
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
8
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
9
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
10
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
11
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
12
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
13
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
14
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
15
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
16
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
17
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
18
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
19
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
20
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...

क्रीमिलेअरना आरक्षणातून वगळण्याचा फेरविचार करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 01:51 IST

अनुसूचित जाती व जमातींमधील ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांच्या मुला-मुलींना शाळा प्रवेश तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण असता कामा नये, असा आदेश देताना क्रिमी लेअर हा शब्दप्रयोग केला होता.

नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमातीतील क्रीमिलेअरमधील व्यक्तींना राखीव जागांमधून वगळावे, या निकालाच्या पुनर्विचारासाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. क्रीमिलेअरमधील व्यक्तींना आरक्षणाचा फायदा देऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या पीठाने २०१८ साली म्हटले होते.अनुसूचित जाती व जमातींमधील ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांच्या मुला-मुलींना शाळा प्रवेश तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण असता कामा नये, असा आदेश देताना क्रिमी लेअर हा शब्दप्रयोग केला होता. या निकालाचा फेरविचार करावा आणि या याचिकेची सुनावणी सात न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे व्हावी, अशी विंनती केंद्र सरकारने केली आहे.सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यापुढे ही याचिका आली असता, ते म्हणाले की, क्रिमी लेअरमधील व्यक्तींना आरक्षणाबाहेर ठेवावे का, याची सुनावणी मोठ्या खंडपीठापुढे व्हावी का, यावर दोन आठवड्यांत निर्णय घेण्यात येईल. अनुसूचित जाती-जमातींच्या अनेक संघटनांनी न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणीही या संघटना व काही व्यक्तींनी केली होती.अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देताना त्यांच्या आर्थिक स्थितीचा विषय आला नव्हता वा तो निकषही तेव्हा लावण्यात आला नव्हता. सामाजिकदृष्ट्या मागासलेपण हाच निकष आरक्षणासाठी लावण्यात आला होता. असे असताना आता आरक्षणाचे निकष न्यायालयाने बदलणे योग्य नाही, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.आर्थिक मागासलेपण व सामाजिक मागासलेपण या दोन वेगळ्या बाबी असून, अनुसूचित जाती-जमातींसाठी आर्थिकदृष्ट्या मागासलेपण हा निकष लागू शकत नाही, असे त्यांच्या संघटनांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय